भुसावळ-पुणे-भुसावळ रेल्वे सुरु होणार ; रक्षा खडसेंनी घेतली रेल्वे मंत्र्यांची भेट
जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जुलै २०२४ । भुसावळ-पुणे-भुसावळ नवीन रेल्वे सुरु करणे, रावेर लोकसभा क्षेत्रांतर्गत असणाऱ्या रेल्वे स्टेशनवर विविध एक्स्प्रेस गाड्यांना थांबा देणे आणि आधी सुरु असलेल्या व कोविड कालावधीत थांबा रद्द केलेल्या गाड्यांना पुन्हा थांबा देण्याबाबत तसेच दरवर्षी प्रमाणे आषाढी एकादशी निमित्त अनारक्षित मोफत “विशेष आषाढी रेल्वे” साठी रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांची केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंनी दिल्ली येथे भेट घेऊन मागणी केली.
जळगाव तसेच बुलढाणा जिल्ह्यातील अनेक नागरिक पुणे येथे स्थायिक असून, कामानिमित्त जाणाऱ्यांची संख्या सुद्धा खूप असल्याने भुसावळ-पुणे रेल्वे सुरु करणे बाबत प्रवाश्यांची अनेक दिवसापासून मागणी होती, त्यानुसार सदर भुसावळ-पुणे-भुसावळ रेल्वे लवकर सुरु होणे
तसेच बोदवड स्टेशन येथे नवजीवन (12655/12656), सुरत-अमरावती (20925/20926), आजाद हिंद (12129/12130), नांदुरा स्टेशन येथे हैद्राबाद-जयपूर सुपरफास्ट (12719/12720), प्रेरणा एक्स्प्रेस (22137/22138), गरीबरथ (12113/12114), रावेर स्टेशन येथे महानगरी (22177/22178), निंभोरा स्टेशन येथे अमृतसर एक्सप्रेस (11057/11058), भुसावळ स्टेशन येथे राजधानी एक्सप्रेस टेक्नीकल हाल्ट (22221/22222) तर मलकापूर स्टेशन येथे अमरावती एक्स्प्रेस (22117/22118), गरीबरथ (12113/12114) ई. गाड्यांना थांबा देणे बाबत तसेच आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर जाणाऱ्या भक्तांसाठी दरवर्षी प्रमाणे दि.16 जुलै जाण्यासाठी व दि.17 जुलै परत येण्यासाठी भुसावळ-पंढरपूर-भुसावळ अनआरक्षित मोफत “विशेष आषाढी रेल्वे” गाडी उपलब्ध करण्यासाठी रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांची भेट घेत रक्षा खडसेंनी मागणी केली. यावर तत्काळ योग्यती कार्यवाही करण्यात येईल असे रेल्वे मंत्री यांनी यावेळी आश्वासन दिले.