⁠ 
सोमवार, जानेवारी 6, 2025
Home | बातम्या | डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घेतली नवीन फौजदारी कायद्याची माहिती

डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घेतली नवीन फौजदारी कायद्याची माहिती

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । डॉ. उल्हास पाटील इग्लिश मिडीयम सीबीएसई स्कुलच्या विद्यार्थ्यांनी १ जुलै पासून लागू होणार्‍या नवीन फौजदारी कायद्यांची माहिती घेतली.

या कार्यक्रमाला पोलीस निरीक्षक सुधीर धायरकर (रेल्वे पोलीस स्टेशन भुसावळ) असिस्टंट पोलीस निरीक्षक भाऊसाहेब मगरे तसेच पोलीस उपनिरीक्षक प्रवीण निकाळजे हे या कार्यक्रमाला उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे स्वागत शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.अनघा पाटील यांनी केले. मान्यवरांनी १ जूलै पासून लागू होणाऱ्या तीन नवीन फौजदारी कायद्यांबद्दल माहिती दिली तसेच ११२ या पोलीस हेल्पलाइन नंबर बद्दल मुलांना सांगितले .कायद्यांबद्दलची माहिती, सुरक्षितता व कायद्याची जाणीव मुलांमध्ये निर्माण व्हावे म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.