जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जून २०२४ । सध्या राज्यातील अनेक भागात जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. काही ठिकाणी पावसाची संततधार सुरू आहे तर काही ठिकाणी अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आजही राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
आज ‘या’ जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज कोकणसाह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणताली रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यात देखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
त्याचबरोबर विदर्भातील अमरावती, यवतमाळ, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यांना देखील पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. यादरम्यान सोसाट्याचा वारा (३०-४० किमी प्रतितास वेग) वाहू शकतो. वीज कोसळण्याची दाट शक्यता वर्तविण्यात आली आहे. या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.
दरम्यान, जळगाव जिल्ह्यात देखील पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे शेतकरी सुखावला असून पेरण्यांना वेग आला आहे.
जळगांव जिल्हातील तालुका पर्जन्यमान(MM
दि28/6/2024
अमळनेर-36
बोदवड-10
भडगाव-
भुसावळ-3.4
पाचोरा-
पारोळा-
जामनेर-11
चोपडा-16
चाळीसगाव-17
रावेर-25
मुक्ताईनगर-
धरणगाव-38
यावल-26.2
एरंडोल-35
जळगाव-