जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जून २०२४ । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगासारख्या उदात्त अशा व्यायामास जागतिक व्यासपीठ देऊन सर्व जगास निरोगी बनवण्याचा एक महामंत्रच दिला आहे. त्याचा अवलंब भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चातर्फे आज आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त शहरातील बिग बाजार येथे योग साधनेचे आयोजन करून करण्यात आला. या प्रसंगी भाजपा पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून योग साधना केली आणि या पुढेही नियमित योग करण्याचा संकल्प केला.
या प्रसंगी जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिताताई वाघ, आमदार राजू मामा भोळे, भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ केतकी पाटील, प्रदेश सचिव रेखा वर्मा, जिल्हा अध्यक्ष महानगर उज्वला बेंडाळे, प्रदेश सचिव कामगार मोर्चा सुधा काबरा, महिला मोर्चाच्या शहराध्यक्ष भारती सोनवणे, महानगर सरचिटणीस वंदना पाटील, महानगर सरचिटणीस नंदिनी दर्जी, महानगर उपाध्यक्ष भाग्यश्रीताई, चिटणीस संगीता पाटील, बेटी बचाव-बेटी पढाओच्या संयोजिका निला चौधरी यांच्यासोबत भाजपा महिला मोर्चाच्या कार्यकर्त्या यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या प्रसंगी सर्वानी योगासने करून योग दिनाच्या शुभेच्छा दिल्यात.