⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | ..म्हणून मी आत्महत्या करतोय, त्यांना सोडू नका; चोपड्यात तरुणाने चिठ्ठी लिहून घेतला गळफास

..म्हणून मी आत्महत्या करतोय, त्यांना सोडू नका; चोपड्यात तरुणाने चिठ्ठी लिहून घेतला गळफास

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जून २०२४ । चोपडा तालुक्यातील एक धक्कादायक घटना समोर आलीय. १७ वर्षीय मुलाने तिघांच्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. मंगेश रेवानंद पाटील असे मृताचे नाव असून मंगेशने मृत्यूपूर्वी लिहिलेली चिठ्ठी घरात पोलिसांना सापडली आहे. त्यात मला त्याच्या हातातून मरायचे नाही महणून आत्महत्या करतो आहे. पण त्यांना सोडू नका असा मजकूर लिहिला आहे. दरम्यान याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

याबाबत असे की, चोपडा तालुक्यातील घुमावल बुद्रुकचा मंगेश पाटील परिवारासह वास्तव्यास आहे. जुले २०२३ मध्ये महेंद्र पाटील, मनोज पाटील, पवन पाटील यांना मंगेश हा गावातील एका मुलीशी शाळेच्या बस स्टॉपवर बोलत असताना दिसल्याने या तिघांनी मंगेशला बेदम मारहाण केली होती. तर ११ जून २०१४ रोजी मंगेश हा कॉलेजच्या कामासाठी रस्त्याने जात असताना महेंद्र पाटील याने मंगेशच्या अंगावर दुचाकी घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करून शिवीगाळ केली. त्यानंतर मंगेशने त्याचे काका माजी सरपंच वसंतराव पाटील यांना सर्व घटना सागितले. महेंद्र, मनोज पवन यांना समज द्या. ते मला कायम धमक्या देतात, त्यांच्या त्रासाला कंटाळलो असून आत्महत्या करेन असे तो म्हणाला होता. त्यामुळे वसंतराव पाटील ग्रामीण पोलिसांना सर्व घटना सांगितली होती. त्यावर पोलिसांनी त्या तिघांना बोलावून समज देत सोडून दिले. असे वसंतराव पाटील यांनी फिर्यादीत म्हटले आहे

मानसिक त्रासाला कंटाळून मृत्यूपूर्व लिहिली विही
मंगेशने मृत्यूपूर्वी लिहिलेली चिठ्ठी घरात पोलिसांना सापडली आहे. त्यात मला त्याच्या हातातून मरायचे नाही म्हणून आत्महत्या करतो आहे. पण त्यांना सोडू नका. माझ्याने आता सहन नाही होणार, यापुढे त्यांनी मला त्याने मारण्याची धमकी दिली आहे. मी फाशी लावून मेला तरी चालेल. पण मला त्यांच्या हातून मरायचे नाही. अशा आशयाची चिठ्ठी त्याने मृत्यूपूर्वी लिहिली आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.