⁠ 
मंगळवार, ऑक्टोबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | काद्यांचा दर कडाडला ! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र गृहिणींचं बजेट कोलमडले ; पहा भाव

काद्यांचा दर कडाडला ! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र गृहिणींचं बजेट कोलमडले ; पहा भाव

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जून २०२४ । सध्या कांद्याचे दर चांगलेच कडाडले आहे. एकीकडे कांद्याच्या वाढलेल्या भावामुळे कांदा उत्पादन शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचं चित्र आहे. मात्र दुसरीकडे गृहिणींचं बजेट देखील कोलमडणार आहे. मागील गेल्या चार पाच दिवसात काद्यांच्या दरामध्ये दुपटीनं वाढ झाली आहे. 40 किलोची गोणी 450 रुपयांवरून 800 रुपयांवर पोहोचली आहे. बाजारात निर्माण झालेल्या कांद्याच्या तुटवड्यामुळे हे दर वाढल्याचं बोललं जात आहे.

उन्हाळ्याच्या सुरुवातीला कांद्याच्या गोणीचे दर 200 ते 250 रुपये होते. तर अखेरीस येणाऱ्या रांगडा कांद्याचे भाव सुरुवातीला 350 रुपये गोणी होते. मात्र, मालाची मुबलकता कमी असल्याने भाव वाढून 400 ते 450 पर्यंत गेले. पावसाळ्याची सुरुवात होत नाही तोच दर जवळपास दुपटीने वाढून बाजार समितीत कांद्यांचे दर 800 रुपये प्रति गोणी झाली आहे. ही दरवाढ गोणी मागे 350 रुपये, क्विंटल मागे 875 रुपये (56 टक्के) इतकी झाली आहे.

यंदा अगोदरच उत्पादन 30 टक्के कमी आले आहे. त्यात उन्हाची तीव्रता वाढल्याने 25 टक्के कांदा खराब झाल्याने दर वाढ झाल्याचे बाजार समितीतील घाऊक व्यापाऱ्यांनी सांगितले. दरम्यान आगामी दोन तीन दिवस पावसाचा अंदाज असून यामुळे आवक कमी झाली तर दर पुन्हा वाढण्याचा अंदाज आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.