महाराष्ट्रात मान्सूनचा जोर वाढणार ! हवामान खात्याचा आज जळगावसह अनेक जिल्ह्यांना अलर्ट

जून 10, 2024 10:52 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जून २०२४ । राज्यातील काही भागात मान्सूनने एंट्री केली आहे. मान्सून दाखल होताच राज्यातील अनेक भागात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. जळगाव जिल्ह्यातील विविध ठिकाणी देखील जोरदार पावसाच्या सरी बरसल्या. त्यामुळे वातावरणात गारवा तयार झाला असून नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली. दरम्यान, येत्या ३-४ तासांत महाराष्ट्रात ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळणार अशा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यापार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे.

10june rain jpg webp

या जिल्ह्यांना अलर्ट
पुणे, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गाला पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अहमदनगर, नाशिक, जळगावात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तिकडे मराठवाड्यातील ,छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, धाराशिव, नांदेडसह परिसराला पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.

कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अहमदनगर, नाशिक, जळगावात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तिकडे मराठवाड्यातील ,छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, धाराशिव, नांदेडसह परिसराला पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.

विदर्भातील, बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, भंडारा जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याच अंदाज आहे. विशेष बाब म्हणजे मान्सून दोन दिवस आधीच मुंबईत दाखल झाला आहे. आता हळहळू मान्सून संपूर्ण राज्याला व्यापणार असून पुढील ४-५ दिवस राज्यातील अनेक भागात तुफान पाऊस होऊ शकतो, असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.

मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग :
दरम्यान मुंबई मान्सून दाखल झाला आहे. यामुळे पहिल्याच पावसाने मुंबईकरांची पुरती तारांबळ उडाली. सखल भागात पाणी शिरल्याने वाहतुकीचा मोठा खोंळबा झाला होता.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now