⁠ 
शनिवार, मे 18, 2024

आनंदाची बातमी : राज्यात ९३ हजार पशुधन लम्पीमुक्त

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ ऑक्टोबर २०२२ । राज्यातील जनतेला एक आनंदाची बातमी मिळाली आहे. ती म्हणजे राज्यातील राज्यातील ९३ हजार पशुधन लम्पीमुक्त झाले आहेत. यामुळे शेतकरी समाधानी झाले आहेत. राज्यातील ९३१६६ पशुधन उपचाराने रोगमुक्त झाले असल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह यांनी दिली.

सिंह म्हणाले की,२५ ऑक्टोबरअखेर ३२ जिल्ह्यांमधील ३०३० गावांमध्ये लम्पी रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित गावांतील एकूण १४३०७९ बाधित पशुधनापैकी ९३१६६ पशुधन उपचाराने रोगमुक्त झाले आहेत. बाधित पशुधनावर उपचार सुरू आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आज अखेर एकूण १४०.९७ लक्ष लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामधून एकूण १३५.५८ लक्ष पशुधनास मोफत लसीकरण करण्यात असून, जळगांव, अहमदनगर, धुळे, अकोला, औरंगाबाद, बीड, कोल्हापूर, सांगली, वाशिम, जालना, हिंगोली, नंदुरबार आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांमधील लसीकरण पूर्ण झाले आहे.