⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | ९० नक्के जगाला माहित नसलेले नैसर्गिक सौंदर्य लपले आहे जळगाव जिल्ह्यात

९० नक्के जगाला माहित नसलेले नैसर्गिक सौंदर्य लपले आहे जळगाव जिल्ह्यात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जून २०२३ ।  जळगाव जिल्ह्याला संपूर्ण जगाला हेवा वाटेल असं नैसर्गिक सौंदर्य निसर्गाने बहाल केल आहे. मात्र कित्येक नागरिकांना याबाबतची माहिती नाही. जिल्ह्यातून नागरिक विविध ठिकाणी फिरायला जातात. मात्र जळगाव जिल्ह्यामध्ये असलेलं नैसर्गिक सौंदर्य हे जळगावकरांनाच माहीत नाही हे दुर्दैव.(places for trip in jalgaon)

आणि हेच नैसर्गिक सौंदर्य हे नागरिकांना माहीत व्हावं यासाठी ‘जळगाव लाईव्ह न्युज’ चा हा छोटासा प्रयत्न. चोपडा तालुक्यातील लासुर चौगाव पासून मुक्ताईनगर तालुक्यातील वडोदा असा तापी नदीला समांतर असलेल्या सातपुडा पर्वत रांगा जळगाव जिल्ह्याला लाभले आहेत. सुमारे दीडशे किलोमीटर लांबी असलेल्या सातपुडा पर्वतरांगांचा जिल्ह्यातील पर्यटकांवर मोठा प्रभाव पडू शकतो. सातपुड्यात आढळून येणारे प्राणी वनस्पती या अतिशय दुर्मिळ आहेत. सातपुडा हे जळगाव जिल्ह्याला लागलेलं वरदान जरी असलं तरी कित्येक जळगावकरांना याबाबतची माहिती नाही.(wild life of jalgaon )

या सातपुडाच्या रांगेत वाघ, बिबटे, अस्वल या हिंस्र प्राण्यांसह नामशेष झालेले रान कुत्रे, उडणारी खार अशा दुर्मिळ प्राण्यांची नोंद होत आहे. यासह चितळ चौशिंगा, ढेकर, चिंकारा, काळवीट या प्राण्यांची देखील नोंद ह्या ठिकाणी आहे. अमरी पादळ, घडशिंगी, सोनसावर वरूण हे दुर्मिळ वृक्ष आपल्याला सातपुड्यामध्ये पाहायला मिळू शकतात. तर नवाब, राजा, पीकॉक रॉयल या फुलपाखरांच्या जाती आपल्या जळगाव जिल्ह्यातल्या सातपुडा मध्ये आहेतच.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह