रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या ! आज भुसावळ मार्गे धावणार ९ विशेष गाड्या

ऑक्टोबर 21, 2025 10:19 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ ऑक्टोबर २०२५ । दिवाळी आणि छठ पूजेसाठी रेल्वेनं अनेक विशेष गाड्या सुरु केल्या असून याच दरम्यान आता मध्य रेल्वे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी म्हणजे आज २१ ऑक्टोबरला तीन विभागातून १७विशेष गाड्या चालवणार आहे. त्यात ९ गाड्या भुसावळ विभागातून धावतील. या सर्व गाड्यांना भुसावळ जंक्शनवर थांबा आहे. त्यामुळे प्रवाशांची सोय होईल.

train

२१ रोजी मुंबई विभागातून ०११४३ एलटीटी दानापूर गाडी सकाळी १०.३० वाजता निघेल. भुसावळ येथे थांबा आहे. ०१०४३ एलटीटी मुजफ्फरपूर पहाटे १२.१५ला निघेल. जळगाव, भुसावळला थांबेल. ०४२२५ एलटीटी वाराणसी सायंकाळी ४.५५ निघेल. भुसावळ येथे थांबा आहे. ०१०७९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-गोरखपूर ही गाडी रात्री १०.३० वाजता निघेल.

Advertisements

जळगाव व भुसावळला थांबेल. पुणे विभागातून ०१४१५ पुणे- गोरखपूर एक्स्प्रेस सकाळी ६.५०ला निघेल. भुसावळला थांबा आहे. ०९४३१ पुणे गाझीपूर सीटी एक्स्प्रेस सकाळी ६.४० वाजता निघेल. जळगाव व भुसावळ थांबा आहे. ०१४४९ पुणे -दानापूर गाडी दुपारी ३.५०ला पुण्याहून निघेल. भुसावळ जंक्शनवर थांबा आहे. तर ०१४०३ पुणे अमरावती एक्सप्रेस रात्री ७.५५ वाजता निघेल. चाळीसगाव, जळगाव, भुसावळ येथे थांबा आहे. ०९२०२ हडपसर नागपूर एक्सप्रेस सायंकाळी ५.५० वाजता निघेल. जळगाव, भुसावळ येथे थांबेल.

Advertisements

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now