जळगाव लाईव्ह न्यूज । ३ मार्च २०२२ । शहरातील रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूल बंद हाेईल, पिसुना परिवार जळगावातून निघून गेला आहे अशा अफवा विघ्नसंताेषी मंडळी पसरवत आहेत. मात्र, असे काहीही झालेले नाही. शाळा सुरुच राहणार असून नियमित शैक्षणिक सत्र सुरू राहणार आहे. तसेच शाळेत नवीन विषयांसह क्रिडा स्पर्धाचे महत्त्व लक्षात घेत ७०,००० स्वे. फूट’चे क्रिकेट मैदान, ३ नेट प्रॅक्टिस क्रिकेट मैदान, २ क्रिकेट कोर्ट बांधण्यात येणार असून याबाबत माहिती देण्यासाठी शाळेचे संचालक विराफ पेसूना यांनी गुरुवारी पत्रकार परिषद आयोजित केली त्यावेळी ते बोलत होते.
पिसुना म्हणाले, येत्या नवीन शैक्षणिक वर्षात अर्थात सन २०२२-२३ पासून रूस्तमजी स्कूलमध्ये नवीन विषयांची सुरुवात केली जात आहे. याचसोबत काही विद्यार्थ्यांसाठी नवीन ॲकटीव्हीटी सुरू केल्या जात आहेत. शाळेची स्थापना १९८०मध्ये झाली. आज मोठ्या प्रशसत इमारतीत शाळा सुरू आहे. यंदाच्या नवीन वर्षापासून शाळेत कोडींग फायनान्सीअल लर्निंग, डाटा सायन्स व आर्टीफिशिअल इंटेलिजन्स हे तीन विषय सुरू केले जात आहेत. त्यामुळे कुणीही अफवांवर विश्वास ठेऊ नये, या प्रसंगी एच.डी. पेसूना, कश्मिरा पेसूना, याजविन पेसूना, काजळ सुखवानी, शिरी चांडक उपस्थित होत्या.