⁠ 
शनिवार, जुलै 27, 2024

प्रवाशांनो लक्ष द्या ! मध्य रेल्वेमार्गावरील ब्लॉकमुळे 69 गाड्या रद्द; पाहा संपूर्ण लिस्ट

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मे २०२४ । मुंबईकडे प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि भायखळा दरम्यान नियोजित ३६ तासांच्या ब्लॉकमुळे ३१ मे ते २ जूनदरम्यान एकूण ६९ लांबपल्ल्याच्या रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. याबाबत माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. विशेष रद्द करण्यात आलेल्या गद्यामध्ये भुसावळ मार्गे धावणाऱ्या काही रेल्वे गाड्यांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सीएसएमटी रेल्वे स्थानकावर २४ डब्यांचा रेल्वे गाड्यांसाठी प्लॅटफॉर्म क्रमांक १० आणि ११ च्या विस्तारीकरासंदर्भात प्री नॉन- इंटरलॉकिंग काम सुरु आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी मध्य रेल्वेकडून ३६ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक ३१ मे म्हणजेच शुक्रवारी मध्यरात्री १२.३० ते २ जून म्हणजेच रविवारी दुपारी १२.३० वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे ६९ मेल- एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर ५० पेक्षा जास्त मेल- एक्सप्रेस गाड्या दादर आणि ठाणे रेल्वे स्थानकांवर शॉर्टटर्मिनेट आणि शॉर्ट ओरिजिनेट करण्यात येणार आहेत. या मेगाब्लॉक कालावधीत सीएसएसएमटी ते भायखळा आणि वडाळा रोड दरम्यानची लोकलसेवा पूर्णपणे बंद राहणार आहे याची प्रवाशांनी नोंद घ्यावी.

३१ मे रोजी या मेल-एक्स्प्रेस रद्द –
१२७०२ हैद्राबाद-सीएसएमटी हुसेन सागर एक्स्प्रेस
१२११२ अमरावती-सीएसएमटी एक्स्प्रेस
१७४१२ कोल्हापूर-सीएसएमटी महालक्ष्मी एक्स्प्रेस
१२२९० नागपूर-सीएसएमटी दुरान्तो एक्स्प्रेस
१२२६२ हावडा-सीएसएमटी दुरान्तो एक्स्प्रेस
१७६११ नांदेड-सीएसएमटी राज्य राणी एक्स्प्रेस

१ जूनला या मेल-एक्स्प्रेस रद्द –
११००९-१० सीएसएमटी- पुणे -सीएसएमटी सिंहगड एक्स्प्रेस
१२१२३-२४ सीएसएमटी- पुणे-सीएसएमटी डेक्कन क्वीन एक्स्प्रेस
१२११० मनमाड-सीएसएमटी पंचवटी एक्स्प्रेस
१२१२६-२७ सीएसएमटी- पुणे-सीएसएमटी प्रगती एक्स्प्रेस
२०७०५-०६ सीएसमटी- जालना-सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेस
११०१२ धुळे-सीएसएमटी एक्स्प्रेस
१२०७२ जालना-सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेस
११००७-०८ सीएसएमटी- पुणे-सीएसएमटी डेक्कन क्वीन एक्स्प्रेस
१२१२८ पुणे-सीएसएमटी इंटरसिटी एक्स्प्रेस
१७६१७-१८ सीएसएमटी- नांदेड-सीएसएमटी तपोवन एक्स्प्रेस
२२२२५-२६ सीएसएमटी-सोलापूर-सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेस
२२२३० मडगाव-सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेस
२२२२३-२४ सीएसएमटी-साई नगर शिर्डी- सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेस
२२११९-२० सीएसएमटी- मडगाव-सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस
१२७०२ हैद्राबाद-सीएसएमटी हुसेन सागर एक्स्प्रेस
१७४११-१२ सीएसएमटी- कोल्हापूर-सीएसएमटी महालक्ष्मी एक्स्प्रेस
१७६११-१२ सीएसएमटी- नांदेड-सीएसएमटी राज्यराणी एक्स्प्रेस
१२१८७ जबलपूर-सीएसएमटी गरीब रथ एक्स्प्रेस

२ जूनला या मेल-एक्स्प्रेस रद्द –
२२१२० मडगाव-सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस
११०१० पुणे-सीएसएमटी सिंहगड एक्स्प्रेस
१२१२४ पुणे-सीएसएमटी डेक्कन क्वीन एक्स्प्रेस
१२११० मनमाड-सीएसमटी पंचवटी एक्स्प्रेस
१२१२६ पुणे-सीएसएमटी प्रगती एक्स्प्रेस
२०७०५ जालना-सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेस
११०१२ धुळे-सीएसएमटी टर्मिनस
११००८ पुणे-सीएसएमटी डेक्कन एक्स्प्रेस
२२२२६ सोलापूर-सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेस
२२२२९ सीएसमटी-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस
१७६१७ सीएसएमटी – नांदेड तपोवन एक्स्प्रेस
२२११९ सीएसएमटी-मडगाव तेजस एक्स्प्रेस
२२२२३ सीएसएमटी-साई नगर शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेस
१२१२७ सीएसएमटी-पुणे प्रगती एक्स्प्रेस
११००७ सीएसएमटी-पुणे डेक्कन एक्स्प्रेस
११०११ सीएसएमटी धुळे एक्स्प्रेस
१२७०१ सीएसएमटी – जालना जनशताब्दी एक्स्प्रेस
२०७०६ सीएसएमटी-जालना वंदे भारत एक्स्प्रेस
१२१८८ सीएसएमटी-जबलपूर गरीब रथ एक्स्प्रेस
२२२२५ सीएसएमटी-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस
१२१२५ सीएसएमटी-पुणे प्रगती एक्स्प्रेस
१२२६१ सीएसएमटी- सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस
१२१२५ सीएसएमटी-पुणे प्रगती एक्स्प्रेस
१२२६१ सीएसएमटी-हावडा दुरान्तो एक्स्प्रेस
११००९ सीएसएमटी-पुणे सिंहगड एक्स्प्रेस
१७६१२ सीएसएमटी-नांदेड राज्य राणी एक्स्प्रेस