⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

ऐन नवरात्रोत्सवात भुसावळ विभागातून धावणाऱ्या 66 रेल्वे गाड्या रद्द ; वाचा रद्द गाड्यांची यादी

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ सप्टेंबर २०२२ । येत्या काही दिवसात नवरात्रोत्सव सुरु होणार आहे. मात्र या काळात भुसावळ विभागातून धावणाऱ्या तब्बल 66 रेल्वे गाड्या रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. यामुळे प्रवाशांची चांगलीच गैरसोय होणार आहे.

दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या बिलासपूर विभागातील रायगड आणि झारसुगुडा स्थानकांदरम्यान चौथ्या मार्गाच्या बांधकामासाठी 22 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत प्री-एनआय आणि एनआय (नॉन इंटरलॉकिंग) काम करण्यात येणार असल्याने रेल्वे गाड्या रद्दचा निर्णय घेण्यात आला. याच पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने ६६ गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. सर्व गाड्या 22 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या वेगवेगळ्या तारखांना प्रभावित होतील.

असे आहे गाड्या रद्द झाल्याचे शेड्युल
12130 हावडा-पुणे – 21 ते 28 सप्टेंबर
12129 पुणे-हावडा – 21 ते 28 सप्टेंबर
12810 हावडा-सीएसएमटी – 21 ते 28 सप्टेंबर
12809 सीएसएमटी-हावडा – 21 ते 28 सप्टेंबर
12860 हावडा-सीएसएमटी – 22 ते 29 सप्टेंबर
12859 सीएसएमटी-हावडा – 21 ते 28 सप्टेंबर
18030 शालीमार-एलटीटी – 21 ते 28 सप्टेंबर
18029 एलटीटी-शालीमार – 21 ते 28 सप्टेंबर
22846 हटीया-पुणे – 23 व 26 सप्टेंबर
22845 पुणे -हटिया – 25 व 28 सप्टेंबर
12880 भुवनेश्वर -एलटीटी – 22, 26 व 29 सप्टेंबर
12879 एलटीटी -भूवनेश्वर – 24, 28 सप्टेंबर व 1 ऑक्टोबर
12905 पोरबंदर -शालिमार – 21,22,28 व 29 सप्टेंबर
12906 शालिमार- पोरबंदर – 23,24,30 सप्टेंबर व 1 ऑक्टोबर
22905 ओखा – शालीमार – 25 सप्टेंबर
22906 शालीमार – ओखा – 27 सप्टेंबर
13425 माल्दा टाऊन – सुरत – 24 सप्टेंबर
13426 सुरत – माल्दा टाऊन – 26 सप्टेंबर
12151 एलटीटी -शालीमार – 21, 22 व 28 सप्टेंबर
12152 शालिमार-एलटीटी – 23, 24 व 30 सप्टेंबर
22894 हावडा-साईनगर शिर्डी – 22 व 29 सप्टेंबर
22895 साईनगर शिर्डी-हावडा – 24 सप्टेंबर व 1 ऑक्टोंबर