जळगाव जिल्हा

हज यात्रेसाठी ६२ हजार अर्ज दाखल, ३१ जानेवारी शेवटची मुदत

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जानेवारी २०२२ । गेल्या काही दिवसात हज यात्रा-२०२२ साठी अर्ज दाखल करणाऱ्या भाविकांच्या संख्येत वाढ झालेली आहे. ८ जानेवारी पर्यंत देशातून ५३ हजारांवर भाविकांचे अर्ज दाखल झालेले होते. तर २० जानेवारीला ही संख्या ६२ हजार झाल्याची माहिती हज कमिटीच्या सूत्रांनी दिली. ३१ जानेवारीपर्यंत अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत आहे.

हज कमेटी ऑफ इंडीयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी याकुब शेख यांनी सांगितले की, भारत आणि सौदी अरब दरम्यान हजयात्रे विषयी आपसात करार झाल्यावर भाविकांच्या अर्ज दाखल करण्याच्या संख्येत वाढ होणार आहे. ८ जानेवारीला केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी हज ट्रेनिंग उद्घाटन प्रसंगी ५३ हजारावर भाविकांचे अर्ज दाखल झाल्याचे जाहीर केले होते. शेवटच्या मुदतीपर्यंत अर्ज दाखल करणाऱ्या भाविकांच्या संख्येत वाढीची शक्यता त्यांनी वर्तवली. यंदाची हजयात्रा पूर्णपणे डिजिटल झाली आहे. भाविक हजयात्रा नोंदणी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज दाखल करत आहेत. मोबाईलचा सुद्धा अर्ज भरण्यासाठी उपयोग होत आहे. त्याचप्रमाणे कोरोना महामारीपासून यात्रेच्या काळात स्वतःची प्रकृती प्रतिकारशक्ती व सुरक्षा आणि प्रार्थना हज यात्रेला सफल बनवेल. भाविकांनीही प्रकृती व सुरक्षेला अधिक महत्त्व दिले आहे.

हे देखील वाचा :

Related Articles

Back to top button