⁠ 
मंगळवार, एप्रिल 30, 2024

पोरांची मज्जा! यंदा ६० दिवसांची उन्हाळी सुटी ; या तारखेनंतर उघडणार शाळा

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ एप्रिल २०२४ । इयत्ता पहिले ते नववीच्या विद्यार्थ्यांच्या सीबीएसई शाळांच्या परीक्षा संपून निकाल देखील जाहीर झाले आहेत. पुढील वर्गांच्या अध्यापनाचे नियोजन करून ते सुरू झाले. या विद्यार्थ्यांना २५ एप्रिलपासून सुटी लागणार आहे. दुसरीकडे मराठी माध्यमाच्या उन्हाळी परीक्षा संपल्यानंतर बहुतांश शाळांना १७ एप्रिलपासून सुटी लागणार आहे. दरम्यान, सुटीनंतर शाळा या वर्षी १५ जूनला उघडणार आहेत.

जिल्ह्यातील मराठी माध्यमाच्या शाळांचे निकाल ३० एप्रिल व १ मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे. तापमान ४० अंशांवर असल्याने सकाळच्या सत्रात परीक्षांचे निकाल तयार करण्याच्या कामाला गती देण्यात आली आहे. मुख्याध्यापकही या संदर्भात वेळोवेळी आढावा शिक्षकांकडून घेत आहेत. यंदा विद्यार्थ्यांना ६० दिवसांची उन्हाळी सुटी देण्यात आलेली आहे.

शिक्षकांना २ मे पासून सुटी लागणार आहे. तर १५ जून रोजी शाळा उघडणार आहेत. विशेष म्हणजे यंदा उन्हाळ्याच्या सुटीत विद्यार्थ्यांना वाचन व लिखाणावर अधिक भर देण्याच्या सूचना शिक्षकांकडून देण्यात आल्या आहेत. खासगी शाळांकडून विद्यार्थ्यांना उन्हाळी गृहपाठ देण्यात आले आहेत. पालकांना या संदर्भात सूचनाही केल्या आहेत