जळगावात भीषण अपघातात आजोबासह 6 वर्षीय नातवाचा जागीच मृत्यू

जानेवारी 26, 2026 9:17 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात अपघाताच्या घटना वाढताना दिसत असून अशातच एका भीषण अपघाताची घटना घडली. भरधाव कंटेनरने दुचाकीला धडक दिली. त्यात दुचाकीस्वार आजोबासह सहा वर्षीय नातवाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बायपासवर पाळधीनजीक सावदे रिंगणगाव फाट्यावर घडली. देशमुख चुन्नीलाल राठोड (५५, रा. निपाणे तांडा, ता. एरंडोल) व परेश दिनेश राठोड (६) असं अपघातातील मृत नातू-आजोबांचे नाव असून राठोड यांच्या पत्नी बेबीबाई राठोड (५०) या जखमी झाल्या. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

acd 1

एरंडोल तालुक्यातील निपाणे येथील रहिवासी देशमुख चुनीलाल राठोड यांनी ३१ डिसेंबर रोजी महामार्गावर कार्यालय असलेल्या एका कंपनीची चारचाकी विकत घेतली. त्यांना लकी ड्रॉमध्ये बक्षिस लागल्याचा त्या कंपनीकडून फोन आला.

Advertisements

म्हणून बक्षिस घेण्यासाठी ते रविवारी दुचाकीने (एमएच १९ ईआर १६४२) पत्नी बेबीबाई व नातूसह जात होते. जळगावकडे बायपासने येताना वळणावर समोरून रिंगणगावकडून भुसावळकडे जाणाऱ्या ट्रॉलाने (एमएच ०५-एएम ३२४८) समोरून धडक दिली. त्यात चाकाखाली येऊन देशमुख व परेश या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर बेबीबाई रस्त्यावर फेकल्याने त्यांचा उजवा हात, पोट व चेहऱ्याला दुखापत झाली. तसेच बेबीबाई यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रताप पाटील यांनी रुग्णालयात भेट दिली.

Advertisements

दरम्यान, अपघातानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. चालक आणि वाहन पाळधी पोलिस ठाण्यात नेण्यात आले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now