---Advertisement---
गुन्हे महाराष्ट्र

भयंकर ! उसाचा ट्रक अंगावर पलटून ६ कामगारांचा मृत्यू, ११ जण जखमी

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । राज्यात अपघाताचे सत्र सुरूच असून अशामध्ये छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात उसाचा ट्रक अंगावर पलटल्याने उसाखाली दबून ६ कामगारांचा मृत्यू झाला. तर तर ११ जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

us truck accident

कन्नड-पिशोर रोडवरील कोळसवाडी खांडीत ट्रक (जीजे १० टीव्ही ८३८६) हा कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी येथून रसवंतीसाठी लागणारा ऊस घेऊन जात असताना हा अपघात झाला. तर जखमींना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

---Advertisement---

उसाने भरलेल्या या ट्रकमधून एकूण 17 प्रवासी प्रवास करत होते. पण घाटात ट्रक येताच अचानक पलटी झाला. त्यामुळे अख्खा उसाचा लोड चार कामगारांच्या अंगावर आला. त्यामुळे ६ कामगार जागीच ठार झाले. तर ११ जण जखमी झाले.

रडारड ऐकून धावले
अपघात झाल्यानंतर मजुरांनी एकच आरडाओरड सुरू केली. परिसरात रडारड सुरू झाली. रडारडीचा आवाज ऐकून गावातील लोक घाटात धावतपळत गेले आणि त्यांनी मजुरांना तात्काळ बाहेर काढण्यास सुरुवात केली. रात्रीच्या अंधारामुळे डेड बॉडी बाहेर काढण्यात अडचणी येत होत्या. अपघातामुळे हे कामगार रस्त्यावर कोसळले. त्यांच्यासोबतच उसाचे लोडही खाली आले आणि कामगारांच्या अंगावर आदळले. मृत झालेले कामगार हे सातकुंड गावातील असल्याचं समोर आले आहेत. त्यांच्या मृत्यूमुळे कन्नड तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment