गुन्हेजळगाव जिल्हा
धनादेश अनादर प्रकरणात एकाला ६ महिन्यांची कैद, दीड लाखाचा दंड
जळगाव लाईव्ह न्यूज । ७ मे २०२४ । विमा काढायला दिलेले पैसे परत करण्यासाठी दिलेला धनादेश न वटल्याने एकाला न्यायालयाने सहा महिन्यांची साधी कैद व दीड लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
राजूसिंग बाबूसिंग परदेशी यांनी २०१४ मध्ये मोहन महादेव वाडकर यांना विमा काढण्यासाठी ९० हजार दिले होते. मात्र विमाही काढत नसल्याने परदेशी यांनी पैसे परत मागितले असता वाडकर याने धनादेश दिला होता. तो न वटल्याने परदेशी बांनी न्यायालयात खटला दाखल केला होता. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायाधीश नीलेश गलमाने यांच्यासमोर हा खटला सुरू होता.
आरोपी मोहन बाडकर गाला सहा महिन्यांची साधी कैद, रकमेचे ९० हजार, दंड ६१२०० रुपये एका महिन्याच्या आत परदेशी याना द्यावेत. मुदतीच्या आत दंडाची रक्कम न दिल्यास दोन महिन्यांची साधी कैद अशी शिक्षा सुनावली