दिव्यांग प्रमाणपत्रात मोठी तफावत; जळगाव झेडपीचे आणखी ६ कर्मचारी निलंबित, कारवाईने खळबळ

जानेवारी 23, 2026 11:05 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । राज्यात दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी मोहिम सुरु असून या मोहिमेअंतर्गत जळगाव जिल्हा परिषदेत मोठे गैरप्रकार उघडकीस येत आहेत. प्रमाणपत्रातील दिव्यांगत्वाच्या टक्केवारीत तफावत आढळून आल्याने आणखी ६ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी केली. यामुळे निलंबित कर्मचाऱ्यांची एकूण संख्या १९ वर पोहोचली असून या कारवाईने जिल्हा परिषद वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

zp jalgaon jpg webp

राज्य शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागामार्फत दिव्यांग कर्मचारी यांची uid कार्ड तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे.यात जळगाव जिल्हा परिषदेच्या विविध आस्थापनावर कार्यरत असलेल्या अधिकारी, कर्मचारी यांची देखील तपासणी करण्यात येत आहे.

Advertisements

या तपासणीत निकषानुसार टक्केवारीत तफावत आढळून आल्याने जिल्हा परिषदेच्या १३ कर्मचाऱ्यांना यापूर्वी निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर आज शुक्रवारी पुन्हा आणखी ६ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले, ज्यामध्ये चार शिक्षकांचा समावेश असल्याने मोठी खळबळ उडाली.

Advertisements

त्यानुसार राजेश विजय खैरनार,आरोग्य सहाय्यक तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय रावेर, प्रदीप बगडू ढाके, आरोग्य सहाय्यक प्राथमिक आरोग्य केंद्र सोनवद या.धरणगाव, अजय पुंडलिक शिरसाठ, प्राथमिक शिक्षक आव्हाने शाळा, ज्ञानेश्वर वेडू चौधरी, प्राथमिक शिक्षण सुनोदा जिल्हा परिषद शाळा, स्वप्नाली वाल्मिक पाटील, प्राथमिक शिक्षक पथराड ता धरणगाव, पंकजा मगनलाल वाघ, प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषद शाळा नगाव ता पारोळा या सहा कर्मचाऱ्याविरुद्ध निलंबनाची कारवाई शुक्रवार दि २३ जानेवारी रोजी करण्यात आली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now