‘या’ 5 शेअरनी गुंतवणूकदारांना केलं मालामाल ; 1 महिन्यात झाले पैसे दुप्पट
जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जानेवारी २०२३ । गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात घसरणीचा टप्पा दिसून आला. मात्र यानंतरही अनेक शेअरने चांगला परतावा दिला आहे. काही शेअरनी केवळ एका महिन्यात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. चला जाणून घेऊयात कोणत्या शेअरने 1 महिन्यात दुप्पट परतावा दिला..
दुप्पट करणारे स्टॉक्स जाणून घ्या
ईएफसीचा शेअर महिन्यापूर्वी रु. 252.00 च्या पातळीवर होता. तर आता हा शेअर आज बुधवारी दुपारपर्यंत रु.770 रुपायांवर गेला आहे. अशा प्रकारे, या शेअरने एका महिन्यात 191 टक्के परतावा दिला आहे.
Lotus Chocolate चा शेअर दर गेल्या महिन्यापूर्वी 96.40 रुपयांच्या पातळीवर होता. तर आता या शेअरचा दर आज बुधवारी दुपारपर्यंत रु. 295 वर आहे. अशा प्रकारे, या शेअरने एका महिन्यात 191.65 टक्के परतावा दिला आहे.
अबीरामी फायनान्शियाचा (Abirami Financia) शेअर दर गेल्या महिन्यापूर्वी 11.55 रुपयांच्या पातळीवर होता. तर आता या शेअरचा दर आज बुधवारी दुपारपर्यंत रु.29 रुपयांवर गेला आहे. अशा प्रकारे, या स्टॉकने एका महिन्यात 138.37 टक्के परतावा दिला आहे.
एका महिन्यापूर्वी इंटिग्रेटेड टेकचा (Integrated Tech) शेअर दर 5.69 रुपयांच्या पातळीवर होता. आणि आता या शेअरचा दर आज बुधवारी दुपारपर्यंत 17.25 रुपये इतका आहे. अशा प्रकारे, या शेअरने एका महिन्यात 188.94 टक्के परतावा दिला आहे.
स्टँडर्ड कॅपिटलचा (Standard Capital) शेअर दर गेल्या महिन्यापूर्वी 16.34 रुपयांच्या पातळीवर होता. आणि आता या शेअरचा दर आज बुधवारी दुपारपर्यंत 49.45 रुपये आहे. अशा प्रकारे, या शेअरने एका महिन्यात 188.34 टक्के परतावा दिला आहे.