---Advertisement---
जळगाव जिल्हा महाराष्ट्र

आजपासून एसटी प्रवासामध्ये ५ रुपये पासून ते ७५ रुपयांची वाढ

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ ऑक्टोबर २०२२ । दरवर्षी दिवाळीच्या काळात एसटी प्रवास भाड्यात होणारी वाढ आजपासून लागू झाली आहे. आजपासून एसटी प्रवासामध्ये ५ रुपये तर ७५ रुपयांची वाढ झाली असून ही भाडेवाढ ३१ ऑक्टोबर पर्यंत लागू असणार आहे. एसटी महामंडळाकडून दिवाळीच्या काळात महसूल वाढीसाठी दरवर्षी अशी वाढ लागू करण्यात येते. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एस. टी. महामंडळाने केलेली हंगामी भाडेवाढ मध्यरात्रीपासून लागू झालेली आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत बाहेर गावी जाणाऱ्या प्रवाशांना आर्थिक झळ सोसावी लागणार आहे. ही दरवाढ साधी (परिवर्तन), निमआराम ( हिरकणी), शिवशाही (आसन) आणि एसी बसेसला लागू राहील. शिवनेरी आणि अश्वमेध या बसेसला ही भाडेवाड लागू राहणार नाही.

bus 3 jpg webp

भाडेवाढ रद्द करण्याची प्रवाशांकडून मागणी
एकीकडे एसटी कर्मचाऱ्यांना बोनस देऊन त्यांची दिवाळी गोड करण्यात आली असली तरी दुसरीकडे मात्र प्रवाशांना ऐन दिवाळीत आर्थिक झळ सोसून प्रवास करावा लागणार आहे महाराष्ट्राचे परिवहन महामंडळाने केलेली हंगामी भाडेवाढ ही प्रवाशांना परवडणारी नसून हे भाडेवाडी कमी करण्याची मागणी सर्व सामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

---Advertisement---

आरक्षण केलेल्या प्रवाशांना फरक द्यावा लागेल
ज्या प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केले आहे त्या प्रवाशांकडून आरक्षण तिकीट दर आणि नवीन तिकीट दर यातील फरक घेण्यात येईल. ही भाडेवाढ एसटीच्या आवडेल तेथे प्रवास तसेच मासिक, त्रैमासिक आणि विद्यार्थी पासेसना लागू करण्यात येणार नाही. १ नोव्हेंबरपासून भाडेवाढ संपुष्टात येईल आणि नेहमीप्रमाणे तिकीट दर आकारले जातील असे एसटी महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---