जळगाव लाईव्ह न्यूज । १२ नोव्हेंबर २०२२ । शहरातील अयोध्या नगरात वास्तव्यास असलेल्या २९ वर्षीय तरुणीची ऑनलाईन मोबाईलद्वारे तब्बल ५ लाख ४० हजारात फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील अयोध्या नगरातील रहिवासी असलेली एका २९ वर्षीय तरुणीला दि. ९ व १० रोजी तिच्या मोबाईलवर अनोळखी इसमाने व्हाटसअपवर संदेश पाठवीत ‘तुम्हाला एका महाविद्यालयात पीएचडीची फी भरण्यास सागितले. दरम्यान, तरुणीच्या परवानगीशिवाय इंटरनेट बँकिगचे आयडी व पासवर्ड घेत बँकेतून गुप्तपणे ४ लाख ७९ हजार तसेच युपीआयहून ६१ हजार असे एकूण ५ लाख ४० हजार रुपये लांबविले.
दरम्यान, फसवणूक झालेल्या तरुणीने तत्त्काळ सायबर पोलिसात धाव घेत अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पो.नीलीलाधर कानडे हे करीत आहेत.