---Advertisement---
जळगाव शहर गुन्हे

‘लकी ड्रॉ’च्या कुपनवरील नंबरवर फोन केला अन्.. जळगावातील महिलेला लागला ५ लाखाचा चुना

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जानेवारी २०२३ । ऑनलाईन फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहे. अशातच जळगावातील नवीपेठेतील महिलेची ऑनलाईन फसवणूक झाली आहे. लकी ड्रॉमध्ये गाडी लागल्याचे कुपन घरी आल्यानंतर महिलेने त्यावरील क्रमंकावर फोन केला आणि तिचे जवळ जवळ ५ लाखांना फसवणूक झाल्याचे समोर आले.याप्रकरणी जळगाव सायबर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime 4 jpg webp webp

नेमकी काय आहे घटना?
जळगाव शहरातील नवीपेठेत गीता राजेश तिलकपुरे यांना नापतोल ऑनलाईन शॉपिंग या कंपनीकडून मारुती स्विफ्ट डिझायर गाडी लकी ड्रॉ मधे लागल्याचे कुपन पोस्टाने राहत्या पत्त्यावर आले होते. या कुपनवर दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे त्यात नमुद केले होते. त्या क्रमांकावर तिलकपुरे यांनी संपर्क साधला. समोरील बोलणाऱ्याने आपले नाव नितीनकुमार सिंग असे त्यांना सांगितले.

---Advertisement---

आपण नापतोल कंपनीतून बोलत असल्याचे सांगून नितीनकुमार सिंग नामक व्यक्तीने तिलकपुरे यांना त्यांच्या व्हाटसअ‍ॅप क्रमांकावर कंपनीचे बनावट नाव, लोगो, स्टॅंप असलेले मिनीस्ट्री ऑफ फायनान्सचे बनावट पत्र असे एक ना अनेक कागदपत्रे पाठवून विश्वास संपादन केला. आपल्याला चारचाकी गाडी मिळणार या आमिषाला भुलून तिलकपुरे यांनी विविध चार्जेसच्या नावाखाली ‘फोन पे’ च्या माध्यमातून नितीनकुमार सिंग नामक व्यक्तीला वेळोवेळी एकूण ४ लाख ८० हजार २४२ रुपये पाठवले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिलकपुरे यांनी बुधवारी जळगाव सायबर पोलिस स्टेशनला तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे हे करत आहेत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---