---Advertisement---
जळगाव शहर

आमदार राजुमामांची जळगावकरांसाठी खुशखबर ; या रस्त्यांच्या कामांसाठी ५ कोटीचा निधी मंजूर

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑगस्ट २०२३ । जळगाव शहरातील रस्त्यांची कामे मार्गी लागणे अत्यंत महत्वाचे आहे. राज्यात भाजपा – शिवसेना जनतेच्या मनातील सरकार आल्यापासून शहराच्या विकासासाठी राज्य शासनामार्फत भरीव निधी देण्यात आलेला आहे. त्यापैकी अनेक रस्त्यांची कामे सुरु आहेत. शहराच्या सर्वांगिन विकासासाठी आमदार राजुमामा भोळे (MLA Suresh Bhole) नेहमी प्रयत्नशील असून शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहेत.

Suresh Bhole RajuMama jpg webp

शहराच्या विकासात भर पडण्यासाठी आज पुन्हा आमदार सुरेश दामु भोळे (राजुमामा) यांच्या मागणीवरून जळगाव शहरातील दलित वस्तीतील रस्त्यांच्या विकासकामांसाठी सामाजिक न्याय विभागामार्फत ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. यासाठी मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, ना.गिरीश भाऊ महाजन, पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

---Advertisement---

जळगाव शहरास शिंदे व फडणवीस सरकार आल्यापासून भरीव निधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार साहेब, ना.गिरीश भाऊ महाजन, पालकमंत्री ना.गुलाबराव जी पाटील यांचे संपूर्ण जळगाव शहर वासीयांच्या वतीने आमदार राजुमामा भोळे यांनी आभार मानले आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---