⁠ 
शनिवार, एप्रिल 13, 2024

नवीन स्कुटर खरेदीचा प्लॅन करताय? ‘हे’ आहेत 5 स्वस्त स्कूटर, किमतीसह वैशिष्ट्ये पहा

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मे २०२३ । जुन्या काळात लोक एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावर जायायला सायकलचा उपयोग जास्त करीत होते. मात्र आता रस्त्यांवर तुम्हाला दुचाकी, चारचाकी वाहने जास्तच दिसून येतील. सायकलीचा उपयोग नाहीसा झालेला दिसून येतो. धरपडीच्या युगात लोक दुचाकीसह कारचा जास्त उपयोग करताना दिसतात. यामुळे बाजारात गाड्या बनविणाऱ्या कंपन्यांमध्ये स्पर्धा लागलीय.

जर तुम्हीही नवीन स्कुटर खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर आज आम्ही तुम्हाला अशा पाच स्कुटर बद्दल सांगणार आहोत. ज्यात Hero Maestro Edge, Honda Activa, TVS Suzuki, Yamaha सारख्या गाड्यांचा समावेश आहे.

Honda Activa 6G आणि Activa 125
भारतीय बाजारात सर्वाधिक विकली जाणारी स्कूटर Honda Activa च्या 6G प्रकाराची एक्स-शोरूम किंमत 76,514 रुपये आहे. यात 110 सीसी इंजिन आहे. याचे मायलेज 50 किमी प्रति लिटर पर्यंत आहे. Honda Activa 125cc ची एक्स-शोरूम किंमत 80,919 रुपये आहे. यात 124 सीसी इंजिन आहे. याचे मायलेज 60 किमी प्रति लिटर पर्यंत आहे.

TVS ज्युपिटर
TVS मोटर कंपनीच्या लोकप्रिय स्कूटर 110 cc व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 74,429 रुपये आहे. त्याचे मायलेज 64 किमी/ली पर्यंत आहे. TVS Jupiter 125 ची एक्स-शोरूम किंमत 84,175 रुपये आहे. त्याचे मायलेज 57 किमी/ली पर्यंत आहे.

TVS NTORQ 125
TVS च्या स्पोर्टी लुक आणि पॉवरफुल इंजिन Ntorq स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 88,915 रुपये आहे. यात 125 सीसी इंजिन आहे. याचे मायलेज 54 किमी प्रति लिटर पर्यंत आहे.

सुझुकी ऍक्सेस 125
सुझुकी ऍक्सेस ही एक शक्तिशाली आणि वैशिष्ट्यपूर्ण स्कूटर आहे. त्याची एक्स-शोरूम किंमत 79,400 रुपयांपासून सुरू होते. हे देखील 89,500 रुपयांवर जाते. मायलेजच्या बाबतीत ही स्कूटर खूप पॉवरफुल आहे.

Hero Maestro Edge 125
ही लोकप्रिय स्कूटर तुम्ही Hero MotoCorp वरून रु.83,966 च्या एक्स-शोरूम किमतीत खरेदी करू शकता. यात 124 सीसी इंजिन आहे. याचे मायलेज 65 किमी प्रति लिटर पर्यंत आहे.