⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | भडगाव | भडगावात सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या बॅगेतून ४५ हजार लंपास

भडगावात सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या बॅगेतून ४५ हजार लंपास

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ नोव्हेंबर २०२२ । सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या बागेतून महिला चोरांनी ४५ हजार रुपये लंपास केले. ही घटना भडगावात १६ रोजी तीन वाजेच्या सुमारास घडली. मात्र, चोर सिसीटीव्हीत कैद झाले आहे. या प्रकरणी भडगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

सविस्तर असे की, भडगाव येथील बस स्थानक समोरील बढे सर कॉम्प्लेक्समधील स्टेट बँकेत पाटबंधारे खात्यातील सेवानिवृत्त शिपाई हे बँकेत आले. त्यांनी काऊंटर वर जाण्यापूर्वी आपली बॅग बाजूला असलेले टेबलावर ठेवली आणि बँकेच्या कर्मचाऱ्याशी संवाद साधत होते. त्याचवेळी दोन महिला चोरांनी बॅगेत ठेवलेले ४५ हजार रुपये लंपास केले. ही घटना 16 नोव्हेंबर रोजी तीन वाजेच्या सुमारास घडली.

मात्र, सर्व घटना सी. सी.टी.व्ही फुटेज मध्ये कैद झाली असून या दोन्ही महिला चोरांचा तपास भडगाव पोलिस करत आहे. या बाबत भडगाव पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह