वहीदत इस्लामी संघटनेतर्फे आयोजित शिबीराचा ४०३ रुग्णांनी घेतला लाभ
जळगाव लाईव्ह न्यूज । २४ ऑक्टोबर २०२१ । अंतिम प्रेषित हजरत मोहम्मद यांच्या जयंतीनिमित्त जळगाव येथील वहीदत इस्लामी संघटनेतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात ४०३ रुग्णांची तपासणी करण्यात आली.
अंतिम प्रेषित हजरत मोहम्मद यांच्या जयंतीनिमित्त वहीदत इस्लामी संघटनेकडून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यानुसार संघटनेतर्फे डॉ. बशीर अन्सारी यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव शहरातील हाजी अहमद नगर, सालार नगर, कासमवाडी व मासुमवाडी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात सर्व समाजातील ४०३ रुग्णांची तपासणी करण्यात आली. काही रुग्णांना पुढील औषधोपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय तर काही रुग्णांना खासगी रुग्णालयात पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली.
या डॉक्टरांचा होता समावेश
शिबिरात डॉ. अमजद खान, डॉ. जन्नतुल निसा, डॉ. सायरा आलम, डॉ. वकार शेख, डॉ. समी अहेमद, डॉ. जहाआरा, डॉ. जावेद शेख, डॉ. खान आदींनी रुग्णांची तपासणी करून औषधोपचार केले. ४०३ रुग्णांमध्ये १५७ महिला व मुलींचा समावेश होता. महिलांच्या तपासणीसाठी विशेष प्राविण्य मिळविलेल्या महिला डॉक्टरांची उपस्थिती होती. त्यात डॉ. जन्नतुल निशा, डॉ. जहाआरा, डॉ. सायरा अस्लम यांचा समावेश होता.