जळगाव जिल्हा

चोरीच्या मोटरसायकलींची विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेले चौघे तरूण पोलिसांच्या ताब्यात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | १ सप्टेंबर २०२१ |  पाटखडकी गावाजवळील रहदारीच्या रस्त्यावर औरंगाबाद जिल्ह्यातून चोरून आणलेल्या मोटरसायकली काही तरुण विकत असल्याची माहिती चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला मिळली . त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कापडणीस, पोलीस हवालदार किशोर सोनवणे, पोलीस नाईक विनोद भोई, राहुल सोनवणे ,पवन पाटील, विनोद खैरनार, भूषण पाटील हे खडकी बुद्रुक येथे पोहोचले तेव्हा त्यांना रहदारीच्या रस्त्यावर काही तरुण असलेले दिसले.  यावेळी पोलिसांनी त्यांची चौकशी केली व त्यांना उत्तर देता न आल्याने त्यांना ताब्यात घेतले.

रोहित मच्छिंद्र धनराज वय 19 राहणार रांजणगाव तालुका पैठण जिल्हा औरंगाबाद, सौरभ साहेबराव इंदापुरे राहणार पान रांजणगाव तालुका पैठण जिल्हा औरंगाबाद, शुभम दमोदर नेवाल 23 गंगापुर जिल्हा औरंगाबाद, महेंद्र शंकर जाधव वय 23 राहणार गणेशपुर तालुका चाळीसगाव, ही त्या ४  आरोपिंची नाव आहेत. त्यांंच्या कडून युनिकॉर्न एचएफ डीलक्स अशा पाच मोटरसायकली ताब्यात देण्यात आल्या आहेत .

या संदर्भात खुलताबाद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरच्या मोटरसायकली ताब्यात घेतलेल्या चार लोकांसह खुलताबाद पोलीस स्टेशनला देण्यात आले आहे

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button