⁠ 
रविवार, मे 19, 2024

.. अन्यथा दीडशे रुपयांसाठी भरावा लागेल ४ हजाराचा दंड ; जळगावकरांनो वाहतुकीचा हा नियम जाणून घ्या

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज| १८ ऑगस्ट २०२३| दुचाकी असो वा चारचाकी; प्रत्येक वाहनापासून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी पीयूसी प्रमाणपत्र बंधनकारक असते. पीयूसी नसेल तर नियमभंग मानून कारवाई होऊ शकते. वाहन तपासणी करून पीयूसी प्रमाणपत्र देण्याकरिता पीयूसी सेंटर कार्यरत आहे. मात्र अनेक गहाण धारक वेळोवेळी वाहन तपासणी करीत नाहीत व पीयूसी प्रमाणपत्र देण्याकरिता पीयूसी सेंटर कार्यरत आहे.

मात्र, अनेक वाहनधारक वेळोवेळी वाहन तपासणी करीत नाहीत व सोबत पीयूसी प्रमाणपत्र बाळगत नाही. परिणामी, असे वाहन तपासणी मोहिमेत उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या निदर्शनास आल्यास ५० किंवा १५० रुपयांसाठी तब्बल २ ते ४ हजार रुपये दंड भरावा लागतो. शिवाय वाहनाचा अपघात झाल्यास व प्रकरण न्यायालयात दाखले झाले तर केवळ पीयूसी नसल्यामुळे वाहन विमा नाकारला जातो.

दुचाकी तपासणी करून पीयूसी काढण्यासाठी ५० रुपये खर्च येतो, तर चारचाकी वाहनांसाठी १५० रूपये खर्च येतो. विना पीयूसी वाहन प्रादेशिक परिवहन विभागाच्या भरारी पथकाच्या तपासणीत दिसल्यास थोड्या रकमेच्या पीयूसीसाठी किमान २ ते ४ हजार रुपयांचा दंड आकारला जातो.