जळगाव लाईव्ह न्यूज । २७ सप्टेंबर २०२१ । शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात असलेल्या सिद्धार्थनगर भागात हातात तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाच्या एमआयडीसी पोलिसांनी भल्या पहाटे मुसक्या आवळल्या आहेत. सागर पुनम कंडारे (वय-२४) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप शिकारे यांना माहिती मिळाली की रामेश्वर कॉलनीत एक तरुण हातात तलवार घेऊन फिरत आहे. पोलीस निरीक्षकांनी तात्काळ पोलीस उप निरीक्षक अनिस शेख, पोलीस नाईक सुधीर सावळे, हेमंत कळसकर, पो.काँ. चंद्रकांत पाटील, पो.कॉ. इमरान बेग आदींनी या कारवाईत सहभाग घेत सागर कंडारे यास अटक केली. सागर कंडारे याच्या ताब्यातून ३० इंच लांबीची लोखंडी तलवार हस्तगत करण्यात आली आहे. पो.कॉ. इमरान बेग यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शस्त्र अधिनियम नुसार त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.