अमळनेरच्या एकाची ३ लाखांत फसवणूक

ऑक्टोबर 8, 2022 1:38 PM

Amalner News-जळगाव लाईव्ह न्यूज । ८ ऑक्टोबर २०२२ । अमळनेर शहरातील ४६ वर्षीय व्यक्तीची नाशिक येथील एकाने ३ लाखांत फसवणूक केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime 2022 09 03T132219.635 jpg webp

शहरातील शिव प्लाझा येथील रहिवासी सुनील रघुनाथ चव्हाण(वय ४६) यांनी संशयित आरोपी समीर सर्जेराव पाटील (रा.सनफलावर सुयोजित गार्डन सहदेव नगर, गंगापूर रोड, नाशिक) याने दि ६ नोव्हेबर २०२१ ते ८ नोव्हेबर २०२१ पर्यंत व्यवहाराची पूर्तता न करत सुनील चव्हाण यांच्याकडून घेतलेले ३ लाख रुपये परत न करत सुनील चव्हाण यांची फसवणूक केली. याप्रकरणी अमळनेर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुनील हटकर हे करीत आहेत.

Advertisements

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now