⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

त्या अल्पवयीन चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्याला फाशी द्या; महिला आघाडीची मागणी

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० नोव्हेंबर २०२१ । चाळीसगाव शहरात चार वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादाय प्रकार २७ रोजी रात्री घडला होता. यातील पिडीत मुलीला जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीने पिडीत मुलीच्या कुटुंबियांची रूग्णालयात भेट घेतली. यावेळी संशयित आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी महिला जिल्हाध्यक्ष रेखा पाटील यांनी केली आहे.

सविस्तर असे की, शहरातील आनंदवाडी भागात चार वर्षीय चिमुरडीला ‘बिस्कीटचा पुडा’ घेवून देता असे सांगून २७ नोव्हेंबर रोजी रात्री ९ ते १० वाजेच्या दरम्यान, निर्जनस्थळी नेत तिच्यावर अमानूषपणे अत्याचार केला होता. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येवून संशयित आरोपी ( आनंदसिंग सावळाराम भानुदास शिंदे (वय-२७) रा. लोंढरे ता.नांदगाव, जि.नाशिक ) याला अटक केली आहे. यात पीडीत चिमुकलीला जळगाव जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, ३० नोव्हेंबर रोजी भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पिडीत मुलीच्या कुटुंबियांची भेट घेवून माहिती जाणून घेतली. महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा रेखा पाटील या म्हणाल्या की, चाळीसगाव शहरातील चार वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी, जेणे करून भविष्यात कोणीही असा गुन्हा करणार नाही.

याप्रसंगी नूतनताई पाटील, निताताई गाजरे, तालुकाध्यक्ष वर्षाताई बारी, सरचिटणीस वर्षाताई पाटील, अनिता दसरे, शोभा देशमुख, शीतल बारी, शीतल कोळी यांच्यासह आदी महिला उपस्थित होत्या.