⁠ 
शुक्रवार, जानेवारी 10, 2025
Home | जळगाव जिल्हा | अमळनेर | शारदा माध्यमिक विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात

शारदा माध्यमिक विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ नोव्हेंबर २०२१ ।  कळमसरे ( ता. अमळनेर ) येथील शारदा माध्यमिक विद्यालयाचे माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा 1994 -95 एस.एस.सी वर्ग या बॅचचे आयोजन करण्यात आले होते. तब्बल 25 ते 26 वर्षांनंतर गुरू व शिष्य दिवाळी निमित्ताने एकत्र आल्याने हा स्नेहमेळावा पार पडला.

 

यांच्या हस्ते कार्यक्रमाला सुरवात झाली 

कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी माजी प्राचार्य जी. आर. चौधरी तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त शिक्षक तसेच गुरुजन वर्ग होते. मा. प्राचार्य चौधरी सर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.

दरम्यान,  माजी विद्यार्थ्यांकडून आजी माजी शिक्षक यांना सन्मानित करून ऋननिर्देश दिले. आयुष्यात चांगला मित्र भेटणे हे सुद्धा भाग्यच लागत असे प्रतिपादन शारदा विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक हिरालाल भोई सर यांनी केले.यानंतर सर्व माजी विद्यार्थ्यांनी शाळेविषयी एकेक किस्से,हास्य कल्लोळ सांगत आपल्या भावनाना वाट मोकळी करून देत मनोगत व्यक्त केले. तब्बल 26 वर्षानंतर माजी विद्यार्थी एकत्र आले; व आपल्या गुरुजनाविषयी कृतज्ञता व्यक्त केली. यामुळे सर्व शिक्षक स्टॉप त्यांचा या अनोख्या सत्काराने भारावून गेले. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्ही पी महाजन यांनी तर आभार प्रकाश महाजन यांनी मानले.

यांनी घेतले परिश्रम 

कार्यक्रम यशस्वीतेसाठी डी. डी राजपूत, सूर्यवंशी सर दिनेश महाजन, रत्नाकर गुरव तसेच मित्र परिवार यांनी परिश्रम घेतले.

 

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.