जळगाव जिल्हाजळगाव शहर
महामार्गावर पाच तासांत दाेन वाहने पेटून काेळसा
जळगाव लाईव्ह न्यूज । ०१ नोव्हेंबर २०२१ । जळगावातून जाणाऱ्या महामार्गावर रविवारी चार किलाेमीटर अंतरात पाच तासांत दाेन वाहने पेटून काेळसा झाली. एका घटनेत शिवकाॅलनी पुलावर टायर फुटल्याने ट्रक पेटला. तर दुसऱ्या घटनेमध्ये बांभाेरी गावाजवळ धावत्या कारला अचानक आग लागली. दाेन्ही घटनांत वित्तहानी माेठ्या प्रमाणात झाली. मात्र, हा प्रकार दाेन्ही वाहन चालकांच्या वेळीच लक्षात आल्यामुळे जीवितहानी टळली.