जळगाव लाईव्ह न्यूज । ५ एप्रिल २०२५ । साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धे शक्तिपीठ असलेल्या नाशिक जिल्ह्यातील वणी येथील श्री सप्तशृंग गडावर दरवर्षी चैत्र पौर्णिमेला मोठी यात्रा भरत असते. या यात्रेसाठी जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात भाविक गडावर जात असतात. त्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या जळगाव विभागातर्फे भाविकांच्या सेवेसाठी यंदा २५० जादा बसेसचे नियोजन करण्यात आले असून, ७ एप्रिलपासून या बसेस सोडल्या जाणार आहेत. सकाळी ६ वाजेपासून या बसेस जिल्ह्यातील ११ आगारातून धावणार आहेत.

चैत्रोत्सवात खान्देशातून येणाऱ्या भाविकांची सप्तशृंग गडावर आदिमायेच्या दर्शनासाठी रीघ लागते. एसटी प्रशासनानेही यात्रेनिमित्त भाविकांसाठी बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे. ७ ते १३ एप्रिलपर्यंत या एसटी बसेस जिल्ह्यातून सप्तशृंगी गड ते पुन्हा जिल्ह्यात अशी सेवा देणार आहे. भाविकांची गर्दी बघून बस संख्याही वाढवली जाणार आहे. जिल्ह्यातून २५० बसेस नांदुरी गडासाठी दररोज सुटणार आहे. शहरातून ५ ते ८ बसेस दररोज सोडल्या जाणार आहेत. सकाळी ६ वाजेपासून भाविकांसाठी बस असणार असून, दर तासाभराच्या अंतरावर बस सोडण्याचे नियोजन केले गेले आहे; मात्र प्रवाशांची संख्या पूर्ण झाल्यावरच या बसेस सोडल्या जाणार आहे.
४५ भाविकांसाठी थेट बस बुक करण्याची सुविधा
जर शहरातील एका भागातील ४५ भाविकांना नांदुरी यात्रेला जायचे असल्यास त्यांना स्पेशल एसटी बस सुध्दा बुक करता येणार आहे. हीच गावातील भाविकांसाठी सुध्दा सुविधा असणार आहे. यासाठी त्यांना कुठलेही अतिरिक्त भाडे आकारले जाणार नाहीये. उलट ज्या सवलती सुरू आहेत, त्यांचा लाभ घेता येणार आहे. ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांनाही त्यांना असलेल्या मोफत सवलतीचा लाभसुध्दा या ज्यादा बसेसच्या प्रवासात घेता येणार आहे. त्यादृष्टीने नागरिकांनी बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळातर्फे करण्यात आले आहे.
किती भाडे लागेल?
गड ते जळगाव: पुरूष – महिला ४०३ रुपये …. लहान मुले- २०२ रुपये
गड ते भुसावळ : पुरूष – महिला ४५३ रुपये ….. लहान मुले- २२७ रुपये
गड ते पारोळा : पुरूष – महिला ३१३ रुपये ….. लहान मुले- १५७ रुपये
गड ते एरंडोल : पुरूष – महिला ३५३ रुपये ….. लहान मुले- १७७ रुपये
गड ते मुक्ताईनगर : पुरूष – महिला ५१४ रुपये ….. लहान मुले- २५७ रुपये
गड ते यावल : पुरूष – महिला ४९४ रुपये ….. लहान मुले- २४७ रुपये
गड ते चोपडा : पुरूष – महिला ३७३ रुपये ….. लहान मुले- १८७ रुपये
गड ते पाचोरा : पुरूष – महिला ३६३ रुपये ….. लहान मुले- १८२ रुपये
गड ते नाशिक : पुरूष – महिला १३२ रुपये ….. लहान मुले- ६६ रुपये