जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑक्टोबर २०२५ । मध्य रेल्वेद्वारे दिवाळी आणि छठ उत्सवानिमित्त गावी गेलेल्यांना परतीचा प्रवास सोयीचा व्हावा यासाठी विविध विभागांकडून आज ३० ऑक्टोबरला एकूण २५ विशेष गाड्या चालवणार आहे. पैकी तब्बल १७ गाड्या भुसावळ विभागातून धावतील. या सर्व गाड्यांना भुसावळ, ९ गाड्यांना जळगाव, ६ चाळीसगाव आणि ४ गाड्यांना पाचोरा स्थानकावर थांबा आहे.

या गाड्यांमध्ये मुंबई विभागातून ०१०११ क्रमांकाची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नागपूर गाडी रात्री १२.२० वाजता सुटेल. चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ थांबे आहेत. ०१०३१ सीएसएमटी बनारस गाडी ७.३५ वाजता सुटेल. चाळीसगाव, जळगाव, भुसावळ थांबा आहे. ०१०४७ सीएसएमटी – दानापूर गाडी ३ वाजता सुटेल. भुसावळ थांबा आहे. ०१०७९ सीएसएमटी- गोरखपूर गाडी रात्री १०.३० वाजता निघेल. जळगाव, भुसावळ येथे थांबे आहेत. ०२१३९ एलटीटी नागपूर रात्री १२.२ ५ सुटेल. जळगाव, भुसावळ थांबे आहेत. ०९१४३ एलटीटी-दानापूर सकाळी १०.३० वाजता सुटेल. भुसावळ थांबा आहे. ०१०५१ एलटीटी बनारस १२.१५ वाजता सुटेल. जळगाव, भुसावळ थांबे आहेत. ०३३८० एलटीटी धनबाद सायंकाळी ५ वाजता सुटेल. भुसावळ जंक्शनवर थांबा आहे. या विशेष गाड्यांना भुसावळ विभागातून मुंबई, पुणे, नागरपूर जाणाऱ्यांना उपयोग होईल.

पुणे विभागातून सुटणाऱ्या गाड्या
पुणे विभागातून ०९४१५ पुणे – गोरखपूर गाडी ६.५० वाजता, ०१४४९ पुणे -दानापूर गाडी ३.३० वाजता, तर ०९४५७हडपसर – दानापूर गाडी ८.३० वाजता हडपसरहून सुटेल. ०१९२५ हडपसर -झाशी गाडी ३.३० वाजता प्रवास सुरू करेल. चारही गाड्यांना भुसावळला थांबा आहे. ०१४०१ पुणे -नागपूर विशेष पुणे येथून रात्री ८.३० वाजता निघेल. चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ तर ०९४५३ हडपसर – गाझीपूर सिटी दुपारी ४ वाजता निघेल. चाळीसगाव, भुसावळ येथे थांबेल.
नागपूर विभागातून सुटणाऱ्या गाड्या
नागपूर विभाग ०९४१० नागपूर-पुणे गाडी ४.१० वाजता नागपूर येथून सुटेल. भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगावला थांबेल. ०१२०१ नागपूर – हडपसर गाडी नागपूर येथून ७.४० वाजता सुटेल. भुसावळ, जळगाव थांबा आहे. ०१०१२ नागपूर -सीएसएमटी रात्री १०.१० वाजता नागपूरहून निघेल. भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव येथे थांबे आहेत. यामुळे पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची जागेची अडचण सुटण्यास मदत होईल.








