⁠ 
शनिवार, जानेवारी 11, 2025
Home | जळगाव जिल्हा | अमळनेर | विजेचा धक्का लागल्याने २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू

विजेचा धक्का लागल्याने २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Amalner News-जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जुलै २०२२ । एका खासगी रुग्णालयात कंपाउंडर असलेल्या २४ वर्षीय तरुणाला विजेचा धक्का लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना अमळनेरात घडली. याबाबत अमळनेर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

रूपेश दिलीप देवरे (वय २४) असे मृत तरुणाचे नाव आहे. आर. के. नगरमधील रहिवासी रूपेश देवरे हा तरुण डॉ. अंजली चव्हाण यांच्या रुग्णालयात रात्रपाळीला कंपाउंडर म्हणून काम करत होता. रात्री वीज गेल्याने तो जनरेटर सुरु करायला गेला. यावेळी त्याला विजेचा जबर धक्का बसला. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, परिस्थिती गंभीर असल्याने देवरे याला तातडीने ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले.

यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी अमरनाथ मिस्तरी यांच्या माहितीवरुन अमळनेर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास हेड कॉन्स्टेबल सुनील हटकर करत आहेत. दरम्यान, रुपेशच्या घरची परिस्थिती सर्वसाधारण आहे. घरात वडील व मोठा भाऊ मिस्तरी व्यवसाय करून घराची जबाबदारी सांभाळतात. तर रूपेश हा त्यांना मदत करत होता. त्याच्या पश्चात आई, वडिल, मोठा भाऊ, बहीण असा परिवार आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह