⁠ 
शनिवार, मे 4, 2024

प्रवाशांनो लक्ष द्या ! भुसावळ विभागातून जाणाऱ्या ‘या’ 24 रेल्वे गाड्या रद्द

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ नोव्हेंबर २०२३ । रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. भोपाळ विभागातील बुधनी-बरखेरा स्थानकादरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गासाठी नॉन इंटरलॉकिंगचे काम केले जात आहे. यासाठी भुसावळ विभागातून जाणाऱ्या २४ गाड्या रद्द करण्यात येणार आहेत.

रद्द झालेल्या गाड्या :
क्र. १२१५३ लोकमान्य टिळक टर्मिनस – राणी कमलापती एक्स्प्रेस ७ डिसेंबर रोजी रद्द. क्र. १२१५४ राणी कमलापती-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस ८ डिसेंबर रोजी रद्द.
क्र. १२७२० हैदराबाद-जयपूर एक्स्प्रेस २७ नोव्हेंबर ते ६ डिसेंबरपर्यंत तर क्र. १२७१९ जयपूर हैदराबाद एक्स्प्रेस २९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबरपर्यंत रद्द करण्यात आली आहे.
गाडी क्र. ११०७९ लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर एक्स्प्रेस ७ डिसेंबर रोजी तर क्र. ११०८० गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस ९ डिसेंबर रोजी रद्द असेल.
क्र. १२१६१ लोकमान्य टिळक टर्मिनस-आग्रा केंट एक्स्प्रेस ८ रोजी रद्द तर क्र. १२१६२ आग्रा कॅट-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस ९ डिसेंबर रोजी रद्द असेल.
क्र. १९४८३ अहमदाबाद-बरौनी एक्स्प्रेस आणि क्र. १९४८४ बरौनी- अहमदाबाद एक्स्प्रेस २७ नोव्हेंबर ९ डिसेंबरपर्यंत रद्द.
क्र. १९४३० अहमदाबाद-आसनसोल एक्स्प्रेस ३० नोव्हेंबर ते ७ डिसेंबरपर्यंत तः क्र. १९४३६ आसनसोल-अहमदाबा एक्स्प्रेस २ डिसेंबरपर्यंत रद्द.
क्र. ०१४३१ पुणे-गोरखपूर आणि क्र. ०१४३२ गोरखपूर-पुणे विशेष गाडी डिसेंबरपर्यंत पर्यंत रद्द असेल.
क्र. ०१०२५ दादर-बलिया ६ ते ८ डिसेंबर दरम्यान तर क्र. ०१०२६ बालिया-दादर ही गाडी ८ ते १० डिसेंबर यादरम्यान रद्द राहिल. क्र. ०१०२७ दादर-गोरखपूर ७ डिसेंबर तर क्र. ०१०२८ गोरखपूर-दादर ही गाडी ९ डिसेंबर रोजी रद्द.
क्र. १७०२० हैदराबाद-हिस्सार एक्स्प्रेस २ डिसेंबर तर क्र. १७०१९ हिस्सार-हैदराबाद एक्स्प्रेस ५ डिसेंबर रोजी रद्द असेल. क्र. १५०६५ गोरखपूर-पनवेल एक्स्प्रेस ७ व ८ डिसेंबर रोजी तर क्र. १५०६६ पनवेल-गोरखपूर एक्स्प्रेस ८ व ९ डिसेंबर रोजी रद्द असेल.
क्र. ०१९२२ विरांगना लक्ष्मीबाई झांसी-पुणे एक्स्प्रेस ६ आणि क्रमांक- ०१९२१ पुणे-विरांगना लक्ष्मीबाई झांसी एक्स्प्रेस ७ डिसेंबर रोजीची रद्द असेल, असे मध्य रेल्वेतर्फे कळविण्यात आले आहे.

चार गाड्या इटारसी, जबलपूर, कटनीमार्गे धावणार
11071 लोकमान्य टिळक टर्मिनस-वाराणसी कामायनी एक्सप्रेस 27 नोव्हेंबर ते 9 डिसेंबरदरम्यान तसेच 11407 पुणे-लखनौ एक्सप्रेस 28 नोव्हेंबर ते 5 डिसेंबरदरम्यान, 22538 लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर 27 नोव्हेंबर ते 9 डिसेंबरदरम्यान, 12943 बलसाड-कानपूर एक्स्प्रेस 6 डिसेंबर रोजी इटारसी, जबलपूर, कटनीमार्गे धावणार आहे.

चार गाड्या कटनी, जबलपूर, इटारसीमार्गे धावणार
11072 वाराणसी-लोकमान्य टिळक टर्मिनस कामायनी एक्स्प्रेस 27 नोव्हेंबर ते 9 डिसेंबरदरम्यान तसेच 11408 लखनौ-पुणे एक्सप्रेस 30 नोव्हेंबर ते 7 डिसेंबरदरम्यान, 22537 गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस 27 नोव्हेंबर ते 9 डिसेंबरदरम्यान व 12944 कानपूर-बलसाड एक्सप्रेस 8 डिसेंबर रोजी कटनी, जबलपूर, इटारसीमार्गे धावणार आहे.