⁠ 
सोमवार, सप्टेंबर 23, 2024
Home | बातम्या | शहरातील २२ हजार नागरिक फडकावणार होते घरावर तिरंगा मात्र प्रशासनाने हुकवली त्यांची संधी

शहरातील २२ हजार नागरिक फडकावणार होते घरावर तिरंगा मात्र प्रशासनाने हुकवली त्यांची संधी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज ।चिन्मय जगताप जळगाव शहर महापालिके तर्फे मोठ्या उत्साहात हर घर तिरंगा मोहीम (HAR GHAR TIRANGA) राबवण्यात येत आहे. मात्र जळगाव शहरातील तब्बल २२००० नागरिकांना स्वतःचे घर मिळवून देण्यात मनपा प्रशासन अपयशी ठरले आहेत. कारण आता पर्यंत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत स्वतःचे घर हवे यासाठी मनपाला २२००० नागरिकांनी अर्ज केले आहेत. मात्र त्या पैकी ३५० नागरिकांना (ज्यांच्याकडे स्वतःची जमीन किंव्वा पडके घर होते) वगळल्यास इतरांना घर मिळालेली नाहीत. (PM AVAS YOJANA)

केंद्र शासनाने २०१६ साली प्रधानमंत्री आवास योजना संपूर्ण भारतात लागू केली. जळगाव मनपामध्ये हीच योजना २०१७ साली आली. २०१७ पासून आता पर्यंत म्हणजेच गेल्या ५ वर्षात २२००० नागरिकांनी स्वतःचे घर व्हावेयासाठी मनपामध्ये अर्ज केले. या योजने अंतर्गत नागरिकांना (ज्यांच्याकडे स्वतःचे घर नाही असे) शासनातर्फे शासकीय दरात शहरांमध्ये घर देण्यात येते. संपूर्ण भारतात ही योजना बऱ्यापैकी चांगल्या स्थितीत आहे. मात्र जळगाव शहर मनपाकडे नागरिकांसाठी किंबहुना बेघर नागरिकांना घर देण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध नसल्यामुळे अजूनही या 22000 नागरिकांना स्वतःचे घर मिळू शकलेले नाही.

डीपीआर क्रमांक 816 अन्वये मेहरूण (MEHERUN) येथे ४०० घर असलेले घरकुल व पिंपराळा (PIMPARALA) येथे ४१६ घर असलेले घरकुल नागरिकांच्या सोयीसाठी बांधण्यात येणार होते. हा डी.पी.यार किंबहुना प्रस्ताव मान्य करण्यासाठी जून महिन्यामध्ये झालेल्या महासभेमध्ये महासभेच्या पटलावर ठेवण्यात आला होता. मात्र हा प्रस्ताव सर्व नगरसेवकांनी मनपाकडे पुरेसा निधी नसल्याने नामंजूर केला. याच बरोबर हा प्रस्ताव एम.एच.डी.सी म्हणजेच महाराष्ट्र हाऊसिंग डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कडे वर्ग केला. यामुळे आता महाराष्ट्र हाऊसिंग डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन याबाबतच्या निर्णय घेणार आहे. याला किती वेळ लागेल हे सांगता येणार नाही.

फक्त ३५० नागरिकांना मिळाले हक्काचे घर
जळगाव शहरातील साडेतीनशे नागरिकांना या योजनेतून स्वतःचे घर मिळाले आहे. या सर्व नागरिकांकडे स्वतःची जागा असल्यामुळे प्रशासनातर्फे या नागरिकांना अडीच लाख रुपये देण्यात आले. व या नागरिकांनी स्वतःचे हक्काचे घर बांधून घेतले.

प्रश्नाचे उत्तर व्यवस्थित रित्या देते जात नाही
मनपाच्या दहाव्या माळ्यावर पंतप्रधान आवास योजनेबाबत दररोज नागरिक मोठ्या प्रमाणावर चौकशी करायला येतात. या नागरिकांना स्वतःची हक्काचे घर मिळेल अशी आस असल्यामुळे नेहमीच हे नागरिक या ठिकाणी येऊन चौकशी करत असतात. मात्र याबाबत शासनाकडून किंबहुना मनपातर्फे नागरिकांना कोणत्याही प्रश्नाचे उत्तर दिलेते जात नाही. अशी तक्रार नागरिकांनी जळगाव लाईव्हशी बोलताना केली.

प्रशासन आपल्या परीने त्यांना न्याय देण्याचा करतय प्रयत्न.
प्रधानमंत्री आवास योजनेबाबत चौकशी करायला किंबहुना त्यासाठी अर्ज करण्यासाठी वेळोवेळी नागरिक आमच्याकडे येत असतात. आम्ही आतापर्यंत तब्बल 22 हजार नागरिकांकडून फॉर्म भरून घेतले आहेत. सर्वच नागरिक जळगाव शहर मनपा हद्दीतली असल्यामुळे मनपा प्रशासन आपल्या परीने त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करत आहेत.
विवेक शेंगदाणे, प्रधानमंत्री आवास योजना अधीकारी, जळगाव मनपा

लवकरच कामाला सुरुवात होणार
याबाबत मनपा आयुक्त विद्या गायकवाड यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी उत्तर दिले की, याबाबत सी.एम.वाय लवकरच निर्णय घेणार आहे. वेळोवेळी सी.एम.वाय तर्फे मनपा प्रशासनाला याबाबतची माहिती देण्यात येते. शासनातर्फे मनपाला वेळोवेळी डी.पी.आर.चे टार्गेट दिले जाते. अडीच वर्षापासूनकोरोना आल्याने याबाबत शासनाने अजूनही कोणतेही आदेश किंबहुना सूचना मनपाला केलेली नाही. लवकरच याबाबतचे टार्गेट मिळताच कामाला सुरुवात होणार आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह