---Advertisement---
जळगाव जिल्हा पाचोरा

पाचोरा येथील २१ वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज| ७ ऑगस्ट २०२३। पाचोरा शहरातील पुरुषोत्तम नगर येथील २१ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. पाचोरा शहरातील पुनगाव रोडवरील पुरुषोत्तम नगर भागातील रहिवासी राजश्री विरेंद्र पाटील (वय – २१) या तरुणीने घरात कोणी नसतांना राहत्या घराच्या छताला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविल्याचा धक्कादायक प्रकार शेजारच्यांच्या लक्षात येताच एकच खळबळ उडाली.

Untitled design 10 jpg webp webp

घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक योगेश गणगे, सहाय्यक फौजदार सुनिल पाटील, पोलिस काॅन्स्टेबल संतोष राजपुत, गुणवंत पाटील हे घटनास्थळी दाखल होवुन घटनास्थळाचा पंचनामा करत रुग्णवाहिका चालक अमोल पाटील व किशोर लोहार यांच्या मदतीने राजश्री पाटील हिस ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी राजश्री पाटील हिस मृत घोषित केले.

---Advertisement---

मयत राजश्री पाटील ही जळगांव येथे शिक्षण घेत होती. राजश्री पाटील हिच्या वडिलांचे निधन झाले असुन आई पाचोरा तालुक्यातील पुनगाव ग्राम पंचायतीत कर्मचारी म्हणून कार्यरत असुन राजश्री हिची आई चाळीसगाव येथे गेल्या होत्या. घटने प्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस काॅन्स्टेबल नरेंद्र नरवाडे हे करीत आहे. आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले ? हे अद्याप समजु शकले नाही.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---