⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | भुसावळ | उपमुख्यमंत्रीअजित पवार यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन

 उपमुख्यमंत्रीअजित पवार यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ सप्टेंबर २०२१ । राष्ट्रवादी युवक काँग्रेस जळगांव जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य व जिल्हा नियोजन समिती सदस्य रवींद्र नाना पाटील यांच्या साकेगाव-कंडारी या जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकनेते मा.एकनाथ खडसे वाढदिवसाच्या औचित्य साधून १० कोटींच्या विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा  भुसावळ येथे राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री .एकनाथ खडसे व जळगाव जिल्हाचे निरीक्षक अविनाश आदिक यांच्या ऑनलाइन उपस्थितीत तसेच जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. जिल्हा परिषदेचा एक तरुणतुर्क सदस्य एखाद्या आमदारालाही लाजवेल असा १० कोटींचा निधी आपल्या जि.प.गटासाठी घेऊन येतो व हा विकासनिधी आपल्या माणसांच्या सर्वांगीण विकासासाठी वापर करण्याचा मानस ठेवतो हे आदर्श उदाहरण आहे.

 

यावेळी उपमुख्यमंत्री यांनी जिल्हा नेहमीच विकासाच्या दिशेने राजकारण करणारा जिल्हा असल्याचं सांगत येथील माणसं विकासाचं ध्येय ठेवून राजकारण करत असल्याचं मत मांडलं. तसेच यानंतरही जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटलांच्या तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचा शब्द दिला. यासोबतच रवींद्र पाटलांचं कौतुकही त्यांनी केलं.

 

याप्रसंगी, भुसावळ येथील याभूमिपूजन सोहळ्याला पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार लोकनेते निलेश लंके, विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, तसेच जिल्हा बँकेच्या चेअरमन रोहिणी खडसे खेवलकर, माजी आमदार अरुण पाटील, ज्येष्ठ नेते संजय गरुड, राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी, ज्येष्ठ नेते प्रमोद अमृत पाटील, वाल्मिक पाटील, माजी भुसावळ नगराध्यक्ष उमेश नेमाडे, राष्ट्रवादी किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एजाज अब्दुल गफ्फार मलिक, अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष मजहर पठाण, मा.जि.प.सदस्य रमेश नागराज पाटील, भुसावळ नगराध्यक्ष रमण भोळे, भुसावळचे ज्येष्ठ नगरसेवक प्रा.डॉ.सुनील नेवे , कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सचिन चौधरी,सावदा माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे,जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र विश्वनाथ चौधरी,भुसावळचे नगरसेवक देवा वाणी, पुरुषोत्तम नारखेडे, किरण कोलते, भुसावळ राष्ट्रवादी शहराध्यक्ष नितीन धांडे, जिल्हा सरचिटणीस मा.ईश्वर रहाणे, जिल्हा परिषद राष्ट्रवादीचे माजी गटनेते विनोद तराळ, चोपडा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.