आज 203 रेल्वे गाड्या रद्द ; प्रवासाआधी जाणून घ्या रद्द झालेल्या गाड्या
जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जुलै २०२२ । भारतात दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी आणि स्वस्त प्रवासासाठी लोक रेल्वेला खूप प्राधान्य देतात. मात्र, रेल्वेतून प्रवास करताना काही वेळा उशीर होत असल्याचेही अनेकदा दिसून आले आहे. हे अनेक कारणांमुळे होऊ शकते. काही वेळा काही गाड्या रद्दही केल्या जातात, त्यामुळे लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. आजही रेल्वेने अनेक गाड्या रद्द करून फेऱ्यांचे वेळापत्रक बदलले आहे.
रेल्वे सुधारण्यासाठी भारतीय रेल्वेकडून वेळोवेळी पावले उचलली जातात. मात्र, खराब हवामान, तांत्रिक समस्या, ट्रॅकची दुरुस्ती आदींमुळे रेल्वे वाहतूक खोळंबते. त्यामुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय काही वेळा गाड्यांचे मार्गही वळवले जातात. त्याच वेळी, काही वेळा गाड्यांचे वेळापत्रक देखील बदलले जाते.
त्यामुळे अनेक गाड्या रद्द
आज देशात अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. एकूण 203 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यापैकी 158 गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या असून 45 गाड्या अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय काही गाड्यांचे वेळापत्रकही बदलून वळवण्यात आले आहे. यापैकी 5 गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे, तर 2 गाड्या वळवण्यात आल्या आहेत.
असे तपासा
आज देशात कोणत्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत याची माहिती https://www.irctchelp.in/cancelled-trains-list/ या लिंकवरून मिळू शकते. याशिवाय, आज कोणत्या गाड्या वळवण्यात आल्या आहेत किंवा त्याचे वेळापत्रक बदलले आहे, या माहितीसाठी https://www.irctchelp.in/train-rescheduled-diverted-today-updates/ या लिंकवर क्लिक करा.