⁠ 
[rank_math_breadcrumb]

यंदाच्या वर्षात लग्नासाठी शुभ मुहूर्त कोणते? चेक करून घ्या तारखा?..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । नवीन वर्षाच्या सुरुवातीसोबतच अनेक जण आप-आपल्या जीवनातील महत्त्वाच्या कामांची तयारी करत आहेत. काही जण घर खरेदी करण्याचा विचार करत आहेत, तर काही जण लग्नाच्या तयारीत आहेत. (Wedding Shubh Muhurtas 2025)

हिंदू धर्मात कोणतेही कार्य करण्यासाठी शुभ मुहूर्त अत्यंत महत्त्वाचा असतो. शास्त्रानुसार, जे 16 सण किंवा विधी सांगितले आहेत. त्यात लग्न सोहळा हा एक महत्त्वाचा विधी आहे. त्यामुळे विवाह करताना शुभ मुहुर्त पाहिला जातो. यंदाच्या वर्षी म्हणजे 2025मध्ये विवाहासाठी एकूण 74 शुभ मुहूर्त आहेत. जानेवारीपासून ते डिसेंबरपर्यंतचे शुभ मुहूर्त आज आपण जाणून घेणार आहेत..

2025 विवाह शुभ मुहूर्त
जानेवारी 2025
:
जानेवारी महिन्यात अनेक शुभ मुहूर्त आहेत जसे की,16, 17, 18, 19, 20, 21, 23, 24, 26 आणि 27 जानेवारीला शुभ मुहूर्त आहेत.

फेब्रुवारी
फेब्रुवारीमध्ये 2, 3, 6, 7, 12, 13, 14, 15, 16, 18, 19, 21, 23 आणि 25 तारीख शुभ आहे.

मार्च
मार्च महिन्यात 1,2, 6, 7, आणि 12 तारीख विवाहासाठी शुभ आहेत.

एप्रिल
एप्रिल महिन्यात 14, 16, 18, 19, 20, 21, 25, 29, आणि 30 तारीख विवाहासाठी शुभ आहेत. एप्रिल महिन्यात एकूण 9 शुभ मुहूर्त आहेत.

मे
मे महिन्यात 1, 5, 6, 8, 14, 15, 16, 17, 18, 22, 23, 24 आणि 28 तारीख शुभ आहेत. (Wedding Shubh Muhurtas 2025)

जून
जून महिन्यात 2, 4, 5, 7 आणि 8 या तारखा लग्नासाठी शुभ आहेत.

नोव्हेंबर
2, 3, 6, 8, 12, 13, 16, 17, 18, 21, 22, 23, 25 आणि 30 या नोव्हेंबर महिन्यातील तारखा लग्नासाठी शुभ आहेत.

डिसेंबर
डिसेंबर महिन्यात फक्त 4, 5, आणि 6 या तीन तारखा विवाहासाठी शुभ आहेत. दरम्यान, 2025 या वर्षात जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, आणि ऑक्टोबर या महिन्यात विवाहासाठी कोणतेही शुभ मुहूर्त नाहीत. कारण, जून महिन्यात भगवान विष्णू 4 महिन्यांसाठी योग निद्रेला जातात. यानंतर थेट नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात शुभ मुहूर्त आहेत.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.