अमळनेर येथे २ वर्षाच्या चिमुकल्याचे पिसाळलेल्या कुत्र्यांनी तोडले लचके

ऑगस्ट 9, 2023 1:40 PM

जळगाव लाईव्ह न्यूज| ९ ऑगस्ट २०२३। पिसाळलेल्या दोन कुत्र्यांनी एका दोन वर्षांच्या बाळाला घरासमोरून उचलून नेऊन त्याचे लचके तोडल्याची घटना मंगळवारी (ता. ८) सकाळी साडेदहाच्या सुमारास देशमुखनगरमध्ये घडली. देशमुखनगरमध्ये प्रांशु ओजस सूर्यवंशी हा दोन वर्षे वयाचा चिमुकला आपल्या घराच्या गेटमध्ये खेळत असताना अचानक दोन कुत्रे आले आणि त्याला ओढून नेऊन त्याचे लचके तोडण्यास सुरुवात केली.

Untitled design 11 jpg webp webp

मुलगा रडायला लागताच, त्याठिकाणी असलेल्या संगीता पवार यांना आवाज येताच त्यांनी धावत जाऊन बाळाची कुत्र्यांच्या तावडीतून सुटका केल्याने बाळाचा जीव वाचला.त्याला ताबडतोब ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. प्राथमिक उपचार म्हणून बाळाला इंजेक्शन देण्यात आले.

Advertisements

मात्र बाळाच्या अंगावर अनेक खोल जखमा झालेल्या असल्याने त्याची प्रकृती गंभीर असल्याने तसेच एआरएस इंजेक्शन अमळनेरमध्ये उपलब्ध नसल्याने त्याला उपचारासाठी धुळे जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले. तेथे त्याला जखमांजवळ एआरएस इंजेक्शन देण्यात आल्याने त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे.

Advertisements

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now