अभियंता तरुणीला क्रेडिट कार्ड सर्व्हिसच्या नावाने २ लाखांचा गंडा
जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मार्च २०२२ । शहरातील पंचमुखी हनुमान मंदिराजवळ असलेल्या रणछोड नगरात राहणाऱ्या एका अभियंता तरुणीला काही दिवसांपूर्वी एक अनोळखी क्रमांकावरून फोन आला होता. क्रेडिट कार्ड सर्व्हिसच्या बहाण्याने संबंधित व्यक्तीने केलेल्या सूचनांचे पालन केले असता चक्क १ लाख ९७ हजारांचा चुना लावल्याचा प्रकार बुधवारी समोर आला आहे.
निकीता जितेंद्र कोल्हे (वय २६) या तरुणीने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार पुणे येथील ऍमडॉक्स कंपनीत सॉप्टवेअर इंजिनिअर या कंपनित कामास आहे. तिच्याकडे आयसीआयसीआय बँकेचे क्रेडीट कार्ड असून त्याचा क्र. ६४०३५ ६२०४८७६९६००३ असा असून सदरचे कार्ड हे मागील ०२ महीन्यापुर्वी घेतलेले आहे. दि.०७ मार्च रोजी घरी असताना तिच्या मोबाईलवर दुपारी ०३.१३ वाजता मो.क्र. ८०५१४२९४३६ वरुन फोन आला.
मोबाईल धारक ही हिंदी भाषेत बोलली की, आपको क्रेडीट कार्ड की सवलत चाहीए क्या चाहीए होगी तो मै आपको ५० हजार रुपयाचे बिल भेज दूंगी म्हणुन संबंधित व्यक्तीने केलेल्या सूचनांचे पालन केले असता चक्क १ लाख ९७ हजारांचा चुना लावल्याचा प्रकार बुधवारी समोर आला असून फसवणुक झाल्याची लक्षात येताच तिने पोलिसांत धाव घेत फिर्यादी दिली.