जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जुलै २०२५ । रेल्वे प्रवाशांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. ती म्हणजे भुसावळ विभागातून धावणाऱ्या १० रेल्वे गाड्यांना प्रत्येकी दोन जनरल डबे जोडले जाणार आहे.

खरंतर रेल्वे गाड्यांना नेहमी गर्दी असते. त्यात वेटिंग तिकीट असूनही प्रवाशांना आरक्षित डब्यात बसण्यास मज्जाव आहे. त्यामुळे जनरल डब्ब्यात मोठी गर्दी दिसून येत. यातच भुसावळ विभागातून धावणाऱ्या १० रेल्वे गाड्यांना प्रत्येकी दोन जनरल डबे जोडले जातील. यामुळे मेल, एक्स्प्रेस या गाड्यांना आता चार जनरल डबे जोडलेले असतील. पहिल्या टप्यात दहा गाड्यांना दोन अतिरिक्त डबे जोडले जात आहे. एक डबा पुढे तर दुसरा मागील बाजूला जोडला जाणार आहे. वेळेवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या वाढीव डब्यांचा आधार मिळणार आहे. प्रामुख्याने दिवाळी, लग्नसराई, उन्हाळी सुटी या गर्दीच्या हंगामात जागेचा प्रश्न निर्माण होतो. तो यामुळे सुटण्यास काहीशी मदत होईल.

अप-डाऊन मार्गावरील या गाड्यांना जोडले जातील डबे
यात सीएसएमटी-बल्लारशहा नंदीग्राम एक्स्प्रेसला ५ सप्टेंबरपासून तर बल्लारशहा -छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या गाडीला ७ सप्टेंबरपासून डबे लागतील, दादर – बलिया विशेष गाडीला ८ सप्टेंबरपासून तर बलिया दादर या एक्स्प्रेसला १० सप्टेंबरपासून तसेच दादर – गोरखपूर विशेष गाडीला ६ सप्टेंबर तर गोरखपूर – दादर एक्स्प्रेस या गाडीला ८ सप्टेंबरपासून, पुणे – नागपूर एक्स्प्रेस या गाडीला ६ सप्टेंबर, तर नागपूर – पुणे एक्सप्रेस या गाडीला ७ सप्टेंबरपासून नवीन डुबे जोडतील, कोल्हापूर – नागपूर एक्स्प्रेस या गाडीला ५ सप्टेंबर तर नागपूर कोल्हापूर एक्स्प्रेस या गाडीला ६ सप्टेंबरपासून वाढीव डबे जोडणार आहे.







