जळगाव लाईव्ह न्यूज । १ नोव्हेंबर २०२५ । आजपासून नोव्हेंबर महिन्याला सुरुवात झाली असून आणि पहिल्याच दिवसापासून अनेक महत्वाचे नियम बदलले आहेत. ज्याचा तुमच्या रोजच्या पैशांवर परिणाम होऊ शकतो. आधार अपडेट फी आणि बँक नामांकनात बदलापासून जीएसटी स्लॅब आणि कार्ड फी पर्यंत आम्ही तुम्हाला 7 बदलांबद्दल सांगणार आहोत. ज्याचा थेट तुमच्या खिशावर परिणाम होईल.

एसबीआय कार्ड यूजर्ससाठी नवीन फी
1 नोव्हेंबरपासून एसबीआय कार्ड यूजर्सना मोबिक्विक आणि क्रेड सारख्या थर्ड-पार्टी Apps च्या माध्यमातून केलेल्या एजुकेशनशी संबंधित पेमेंटवर 1% फी द्यावी लागेल. त्याशिवाय एसबीआय कार्डद्वारे डिजिटल वॉलेटमध्ये 1,000 रुपयापेक्षा जास्त अमाऊंट टाकल्यास 1 टक्के फी लागेल.

आधार कार्ड
पहिला आणि सर्वात महत्त्वाचा नियम आधार कार्डबाबत आहे. आता तुम्हाला नाव, पत्ता, जन्म तारीख किंवा मोबाईल नंबर अपडेट करायचा असेल, तर आधार केंद्रावर जायची गरज नाही! सगळं काही ऑनलाईन करता येणार. UIDAI आता तुमची माहिती PAN कार्ड, पासपोर्ट, रेशन कार्डसारख्या सरकारी डेटाबेसला आपोआप चेक करेल. म्हणजे, कागदपत्रं मॅन्युअली अपलोड करण्याची झंझटच संपली. फक्त फिंगरप्रिंट किंवा डोळ्यांचा स्कॅन करायचा असेल, तरच केंद्रावर जावं लागेल. बाकीचं काम घरात बसून होईल!

बँक नॉमिनीत बदल
बँक आणि लॉकरच्या नियमात मोठा ‘मास्टरस्ट्रोक’ झाला आहे. आता बँक अकाउंट, लॉकर आणि सेफ कस्टडीसाठी चार (4) लोकांना नॉमिनी बनवू शकता. आधी फक्त एकाच व्यक्तीला नॉमिनी करता यायचं. पण आता तुम्ही ठरवू शकता, की कोणाला किती हिस्सा द्यायचा.
म्युच्युअल फंडाबद्दल
तुम्ही जर शेअर बाजारात किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत असाल, तर SEBI (सेबी) ने नियम कडक केले आहेत. AMC (ॲसेट मॅनेजमेंट कंपनी) चे मोठे अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांचे नातेवाईक जर ₹15 लाखांपेक्षा जास्त व्यवहार करत असतील, तर ती माहिती कंपनीला त्यांच्या ‘वरिष्ठ अधिकाऱ्याला’ द्यावी लागेल. याचा उद्देश एकच आहे – म्युच्युअल फंडात जास्त पारदर्शकता आणणे.
पीएनबी लॉकर फीसमध्ये बदल
पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) लवकरच संपूर्ण भारतात आपल्या लॉकर रेंट फी मध्ये बदल करणार आहे. नवीन रेट्स लॉकरची साइज आणि कॅटेगरीवर डिपेंड असेल. रिपोर्ट्सनुसार, अपडेटेड फीसची अनाउंसमेंट नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. नोटिफिकेशनच्या 30 दिवसानंतर फी प्रभावी होईल.
एनपीएस ते यूपीएस टाइम लिमिट वाढवलं
राष्ट्रीय पेंशन सिस्टिम (एनपीएस) मधून यूनिफाइड पेंशन स्कीम (यूपीएस) मध्ये शिफ्ट होण्यासाठी इच्छुक असलेल्या सेंट्रल गवर्नमेंट एम्प्लॉयीजकडे ही प्रोसेस पूर्ण करण्यासाठी 30 नोव्हेंबर पर्यंतचा वेळ आहे.
पेंशन घेणाऱ्यांना लाइफ सर्टिफिकेट द्यावं लागेल
सर्व रिटायर्ड सेंट्रल आणि स्टेट गवर्नमेंट एम्प्लॉयीज़ला नोव्हेंबरच्या शेवटापर्यंत आपलं वार्षिक लाइफ सर्टिफिकेट जमा करावं लागेल. हे त्यांच्या बँक ब्रांच किंवा जीवन प्रमाण पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाइन केलं जाऊ शकतं. डेडलाइन मिस केल्यास पेंशन पेमेंटमध्ये विलंब किंवा अडथळा येऊ शकतो.




