fbpx

…तर होऊ शकतो डेंग्यू ; ‘या’ गोष्टी काळजीपूर्वक टाळा 

mi-advt

जळगाव लाईव्ह न्युज | ३ सप्टेंबर २०२१ | जळगाव शहरासह जिल्ह्यात डेंग्यूने डोकं वर काढलं आहे. दिवसाला सरासरी ५०० हून अधिक रुग्ण डेंग्यूने बाधित होत आहेत. डेंग्यू झाला तर तो योग्य वेळी तपासला गेला नाही तर जिवावरही बेतू शकते हे डेंग्यूचे भयावह चित्र आहे. मात्र डेंग्यू होऊ नये यासाठी आपण काही गोष्टी काळजीपूर्वक टाळू शकतो.

या गोष्टीवर लक्ष्य द्या !

१) डेंगूचा मच्छर आणि पावसाचे खूप चांगले नाते आहे. डेंगूचा मच्छर हा पावसाळ्यातच आपली अंडी देतो. पावसामुळे शहरात विविध ठिकाणी डपके साठते. या साठलेल्या डोक्यामध्ये डेंग्यूचे मच्छर आपली अंडी देतात. ज्यामुळे डेंग्यूच्या मतदारांची संख्या शहरात वाढते. डबके साठवू नये यासाठी नागरिकांनी प्रयत्न केले पाहिजेत.

२) नागरिकांनी आठवड्यातून एकदा तरी आपल्या घरी कोरडा दिवस पाळला पाहिजे. या दिवशी आपल्या घराच्या परिसरात जिथे जिथे पाणीसाठू शकते ते ठिकाण नागरिकांनी कोरडी केली पाहिजेत जेणेकरून त्या ठिकाणी डेंग्यूचे मच्छर आपली अंडी देणार नाहीत.

३) डेंग्यूचे मच्छर हे उजेडातच चावतात. त्यामुळे दिवसाढवळ्या होणाऱ्या मच्छरांच्या चाव्यापासून नागरिकांनी स्वतःला दूर ठेवले पाहिजे. तुझ्यासाठी फुल पॅन्ट घालणं हा एक चांगला पर्याय आहे

४) डेंग्यूच्या डासांना पासून स्वतःचे रक्षण करण्याचे असेल तर नागरिकांनी वापर करणे गरजेचे आहे याच बरोबर झोपताना मच्छरदाणीचा वापर करणे हे गरजेचे आहे.

५) डेंग्यू हा कमी रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या नागरिकांवर हवी होतो. यामुळे आपला आहार योग्य असेल याकडे नागरिकांनी लक्ष दिले पाहिजे. याच बरोबर बाहेरचे उघड्यावरचे खाणे बंद केले पाहिजे

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज