एरंडोलजळगाव जिल्हा

मोबाईल टॉवर उभारण्यास स्थानिक नागरिकांची हरकत

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जुलै २०२१ ।    एरंडोल येथील ब्राह्मण ओटा , मारवाडी गल्ली आणि पांडव वाडा परिसराच्या केंद्रस्थानी असलेल्या महाराष्ट्र ग्रामिण बँकेच्या इमारतीवर घरमालकानी 5G टॉवर उभारण्याचा घाट घातला आहे.ज्याला स्थानिक विरोध करत आहेत. 

 घरमालक लोकप्रतिनीधी असल्याने आपल्या पदाचा गैरवापर करून स्थानिक प्रशासनावर दबाव आणत असल्याचे म्हटले आहे.भर वस्तीत असलेल्या ठिकाणी या टॉवरमुळे हवेत प्रसारीत होणाऱ्या घातक किरणांच्या माऱ्यामुळे , लहान बालकं,ज्येष्ठ नागरिक पक्षी आणि प्राणि यांच्या जीवीताला धोका उत्पन्न होऊ शकतो.त्यामुळे दाटीवाटीच्या वस्तीतील या मोबाईल टॉवरवर आजुबाजुच्या नागरीकांनी तसेच परिसरातील नागरिकांनी हरकत घेतली असुन नगर पालिकेने दिलेल्या परवानग्या रद्द कराव्यात अन्यथा या बाबत उपोषणास बसण्याची तयारी असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे .या बाबत जिल्हाधिकारी जळगाव , नगर पालिका मुख्याधिकारी एरंडोल व तहसिलदार एरंडोल यांचे कडे तक्रारी अर्ज दिला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button