महाराष्ट्रातील 17 एक्सप्रेस व पॅसेंजर गाड्या तीन वर्षांपासून बंदच ; भुसावळहुन धावणाऱ्या दोन गाड्यांचा समावेश

ऑगस्ट 28, 2025 1:27 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑगस्ट २०२५ । कोविड महामारीच्या लॉकडाऊनदरम्यान बंद करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील तब्बल 17 एक्स्प्रेस आणि पॅसेंजर गाड्या तीन वर्ष उलटूनही पुन्हा सुरू झालेल्या नाहीत. यामध्ये भुसावळहुन धावणाऱ्या पुणे–भुसावळ हुतात्मा एक्स्प्रेससह भुसावळ-मुंबई पॅसेंजरचा समावेश आहे. या गाड्या अजूनही बंदच असल्यामुळे प्रवाश्यांमध्ये नाराजीचा स्वर उमटत असून, प्रशासनाने सामान्यांच्या प्रवास हक्कावर अन्याय केला असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

kokan railway

कोविड महामारीत लॉकडाऊनचे निर्बंध आणि प्रवाशांची घट यामुळे काही गाड्या तात्पुरत्या थांबवण्यात आल्या होत्या. मात्र, कोरोनाचा धोका कमी झाल्यानंतर या गाड्या पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा होती. तरीही तीन वर्ष उलटून गेले तरी त्या गाड्या पुन्हा मार्गावर धावताना दिसत नाहीत, त्यामुळे सामान्य प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. राज्यातील विविध मार्गांवर चालणाऱ्या 17 एक्स्प्रेस आणि पॅसेंजर गाड्या कायमस्वरूपी बंद केल्याचे चित्र आहे.

यामध्ये भुसावळ-मुंबई पॅसेजर गाडीचा समावेश आहे. ही पॅसेंजर कोरोना लॉकडाऊनपूर्वी सकाळी ७ वाजेला भुसावळहुन सुटत होती. भुसावळ भागातील हजारो प्रवाशांना, विशेषतः मुंबईत स्थायिक झालेल्या खान्देशातील नागरिकांना या पॅसेंजर मोठा आधार होता. मात्र कोरोना काळात ती बंद करून कायमस्वरूपी रद्द करण्यात आली. सध्या त्या जागी इनगतपुरी मेमू चालते. परंतु ती कसार्‍यापर्यंत वाढविल्यास प्रवाशांना तेथून लोकलने मुंबईत सहज पोहोचता येईल. रेल्वे प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही कोणतीही कार्यवाही न झाल्याने प्रवासी वर्गात नाराजी आहे.

दुसरीकडे भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेसही अमरावती येथून सुटत असून ती मनमाडमार्गे वळवल्याने मुंबई-कल्याणकडे जाणार्‍या प्रवाशांना मोठा फटका बसला आहे. स्थानिक प्रवासी तसेच लोकप्रतिनिधींकडून रेल्वे प्रशासनाने तातडीने लक्ष घालून भुसावळ-मुंबई पॅसेजर पुन्हा सुरू करण्याची मागणी होत असून भुसावळहुन पुण्यासाठी नवीन ट्रेन सुरु करण्याचीही मागणी होत आहे. जेणे करून पुण्यात शिक्षण, नोकरी, उद्योगधंद्यांसाठी जणाऱ्या खान्देशातील लाखो प्रवाशांना दिलासा मिळाले.

खरंतर जळगाव जिल्ह्याला एक केद्रीय मंत्री तर तीन कॅबीनेट मंत्री लाभलेले असतांना सुध्दा भुसावळ ते मुंबई पॅसेजर ही गाडी सुरू होऊ शकत नाही, ही मोठी शोकांतिका आहे.

बंद केलेल्या काही गाड्या

पुणे–भुसावळ हुतात्मा एक्स्प्रेस
मुंबई–भुसावळ पॅसेंजर
सह्याद्री एक्स्प्रेस (मुंबई–कोल्हापूर) – मुंबई पर्यटनासाठी महत्त्वाची
मुंबई–पंढरपूर / साईनगर शिर्डी–मुंबई जलद पॅसेंजर
पुणे–कर्जत / पनवेल शटल सेवा
कुर्ला–मनमाड–कुर्ला गोदावरी एक्स्प्रेस
दादर–रत्नागिरी पॅसेंजर (दादर येथून सुरू होणारी सेवा बंद)

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now